News Flash

दीपिका, अनुष्का, वरुणसह राणी मुखर्जीचा ‘दोस्ताना’

तिच्या चेहऱ्यावरील हास्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

दीपिका पदुकोण, वरुण धवन आणि अनुष्का शर्मासह राणीचा दोस्ताना यावेळी पाहायला मिळाला.

आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी गेले काही वर्ष लाइमलाइटपासून दूर आहे. दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोप्रासह लग्न केलेल्या राणीने गेल्याच वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर घर आणि मुल सांभाळण्याला तिने प्राधान्य दिले. नुकतीच ती एका पुरस्कार सोहळ्यात दिसली. यावेळी बॉलिवूडमधील काही युवा कलाकारांसह राणीने चांगला वेळ व्यतीत केला. दीपिका पदुकोण, वरुण धवन आणि अनुष्का शर्मासह राणीचा दोस्ताना यावेळी पाहायला मिळाला. पण, त्याचसोबत तिच्या चेहऱ्यावरील हास्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये राणीचे सौंदर्य अधिक खुलून आले होते. काही दिवसांपूर्वीच ३९ वर्षांची झालेली ही अभिनेत्री ‘हिचकी’ या आगामी चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिने यश राज फिल्मसच्या फेसबुक अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला. राणीच्या चाहत्यांनी यावेळी प्रश्नांचा भडीमार करत तिचे स्वागत केले. तू पुन्हा चित्रपटांमध्ये कधी दिसणार? असा प्रश्न तिला सतत यावेळी विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना राणी म्हणाली की, ‘हिचकी’ या चित्रपटाने मी पुनरागमन करत आहे. यात मी चांगला अभिनय करू शकेन अशी मला अपेक्षा असून, त्यासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.

आदिराच्या जन्मानंतर रातोरात आपले आयुष्य बदलल्याचेही राणीने यावेळी सांगितले. २२ वर्षांहून अधिक काळ मी चित्रटपसृष्टीमध्ये काम करतेय. पण ती राणी वेगळी होती. मुलीच्या जन्मानंतर माझा पुनर्जन्म झाला असून आता नव्याने माझे करिअर सुरु होणार आहे, असे राणीने सांगितले. राणी मुखर्जीने ९ डिसेंबर २०१६ ला एका गोंडस बाळाला जन्म दिला. आदित्य आणि राणी यांनी आपल्या नावाच्या अद्याक्षरावरून त्यांच्या मुलीचे ‘आदिरा’ असे नाव ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 6:09 pm

Web Title: ht most stylish award rani mukerji bonding with deepika padukone varun dhawan anushka sharma is a rare sight
Next Stories
1 एफआयआर दाखल झाल्यानंतर शिरीषने मागितली योगी आदित्यनाथांची माफी
2 Phillauri Box Office Collection : जाणून घ्या, ‘फिल्लौरी’ची पहिल्या दिवसाची कमाई
3 दीपिका- नीतूमध्ये आजही ‘स्पेशल’ नाते
Just Now!
X