News Flash

सोशल मीडियावर ‘महारानी’चा धुमाकूळ; हुमा कुरेशीच्या लूकला चाहत्यांची पसंती

बिहारच्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत हुमा कुरेशी

(photo-YOUTUBE/SONY LIV)

‘लैला’ या वेब सीरिजनंतर अभिनेत्री हुमा कुरेशी लवकरच सोनी लिव्हवरील ‘महारानी’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेब सीरिजचा टीझर रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर हा टीझर चांगलाच व्हायरल होत आहे. या टीझरमधील हुमाच्या लूकला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

या वेब सीरिजमध्ये एका महिलेचा गृहिणी ते मुख्यमंत्री असा प्रवास पाहायला मिळणार आहे. बिहारच्या राजकारणातील उलथापालथ या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या जीवनावर आधारित ही वेब सीरिज असल्याचं म्हंटलं जातंय. मात्र निर्मात्यांकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही.

या वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी ‘रानी भारती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. टीझर रिलीज होताच यातील हुमाच्या लूकला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या टीझरमध्ये हुमा एक साधारण गृहिणीच्या रुपात दिसतेय. साधी कॉटनची साडी, मोठी टिकली, कुंकूवाने भरलेला भांग असा तिचा टीपिकल लूक चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. तसचं तिची देहबोली आणि संवाद यामुळे प्रेक्षकांमध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ही वेब सीरिज हुमाच्या करिअरमधील महात्वाचं वळण ठरू शकते असंही म्हंटलं जात आहे.

‘महारानी’ च्या टीझरला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. या टीझरला आतापर्यंत 10 मिलीयनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. या वेब सिरीजमध्ये हुमा कुरेशीसोबत सोहम शाह, अमित सियाल, प्रमोद पाठक आणि इनाम उल हक हे कलाकार झळकतील.

या वेब सीरिजसोबतच हुमा लवकरच ‘बेल बॉटम ‘ या सिनेमात अक्षय कुमारसोबत झळकणार आहे . 2 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सिनेमांच प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 4:15 pm

Web Title: huma qureshi maharani web serie teaser viral huma will play bhihar hief minister kpw 89
Next Stories
1 आईच्या पावलांवर पाऊल, तैमूरचा योगा पाहून करीना म्हणाली…
2 पुरस्कार सोहळ्यात तापसीने केली कंगनाची स्तुती, कंगना म्हणाली…
3 कविता कौशिक ‘बिग बॉस’ला म्हणाली ‘फेक रिअ‍ॅलिटी शो’; “शोमुळे माझी..
Just Now!
X