बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये अनेकांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. सोनू करत असलेल्या या मदतीबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. राजकारण, समाजकारण, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी सोनूच्या या कामाची दखल घेतील आहे. सोनूच्या याच कामावर आता अभिनेत्री हुमा कुरेशी फिदा झालीय. इतकच नाही तर सोनू निवडणुकीसाठी उभा राहिला तर मी नक्कीच माझं मत त्याला देईन, असंही हुमाने म्हटलं आहे. सोनू सूदला पंतप्रधान बनवा. तो पंतप्रधान झालेलं पहायला मला आवडेल, असंही हुमाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

नक्की पाहा >> “मोदी साब..” म्हणत सहा वर्षांच्या मुलीने पंतप्रधानांकडे केली तक्रार; व्हिडीओ झाला व्हायरल

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Kangana Challenges Rahul Gandhi
कंगना रणौतचं राहुल गांधींना आव्हान, “…तर राजकारणच काय, मी हा देश सोडून निघून जाईन”
lok sabha election 2024 narendra modi trusted minister dharmendra pradhan
मोले घातले लढाया :मोदींचे ‘उज्ज्वला’ मंत्री..
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाच्या आठवणीने झाले भावूक?

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हुमा कुरेशीला रॅपिड फायर राऊण्डमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले. याच दरम्यान तिला कोणता अभिनेता एक चांगला राजकारणी होऊ शकेल असं विचारण्यात आलं. यावर एका क्षणाचाही विलंब न लावता हुमाने सोनू सूदचं नाव घेतलं. “मी खूप स्पष्टपणे सांगायचं झाल्यास मला वाटतं सोनू सूदने निवडणुकीला उभं रहावं. मी नक्कीच त्याला मतदान करेन. माझी अशी इच्छा आहे की तो भारताचा पंतप्रधान व्हावा. सोनू सूद भारताचा पंतप्रधान झाल्यास खरोखर खूप चांगलं होईल,” असं हुमाने आपण सोनूला का निवडलं हे सांगाताना म्हटलं.

सध्या हुमा सोनी लाइव्हवरील महारानी नावाच्या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या या वेबसिरीजवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यापूर्वी राखी सावंतनेही सोनू सूदला पंतप्रधान करण्याची मागणी केली होती.

नक्की पाहा >> एका रात्रीसाठी उद्योजकाने दिली २ कोटींची ऑफर; उत्तर देताना मॉडेल म्हणाली, “हे काही…”

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालाय. मात्र या संकटाच्या कालावधीमध्ये सोनू सूद अनेक गरजूंना मदत करत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असताना सोनूने चीनच्या मदतीने देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला. त्यानंतर सोनूने फ्रान्समधील ऑक्सिजन प्लॅण्टमधूनही देशातील करोनाबाधितांसाठी ऑक्सिजनसंदर्भातील उपकरणे मागवली आहेत. लवकरच ही उपकरणे भारतात दाखल होणार आहेत. मागील वर्षी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्यासाठीही सोनूने घर भेजो मोहीम हाती घेतली होती.