प्राण्यांच्या बाबतीत आपण खूप वाईट वागलो आहोत. कोणी कोणाला अधिक मारले याचा हिशोब केला पाहिजे. माणसाने जितके वाघ मारले तितकी वाघाने माणसे मारली का? हे तपासले पाहिजे. खरे तर वाघालाच माणसं खायला घातली पाहिजेत अशी विषम स्थिती आहे. त्यामुळे माणसाने माणूसपण तपासून जगायला पाहिजे, असे रोखठोक मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. वाघाची नसबंदी करण्याच्या धोरणाबद्दल ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, आत्महत्या कुणीच करू नये. सुशांत सिंहने देखील आत्महत्या करायला नको होती. एखाद्याची आत्महत्या झाल्यानंतर चर्चा करणे हा मानव जातीचा खोटेपणाचा कळस आहे. अभिनेते संजय दत्त याची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

झाडं वलयांकित व्हायला हवीत

दोनशे-तीनशे वर्षांची जुनी झाडं शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. या झाडांनी जगाला पुष्कळ दिले आहे. त्यामुळे कोणी नेता-अभिनेता वलयांकित होवू नये. तर अशी जुनी झाडे ही वलयांकित ठरली पाहिजेत. यासाठी अशा झाडांचे नव्या पिढीला दर्शन होण्यासाठी तेथे सहली काढल्या गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच पर्यावरण अभ्यासाकडे आपण पुरेसे लक्ष दिले नसल्याबद्दलही त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली.