अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी कोरिओग्राफर गणेश हिवारकर थेट उपोषणाला बसणार आहे.

अवश्य पाहा – “जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली”; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप

सुशांत आणि गणेशमध्ये खुप चांगली मैत्री होती. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीला आणखी गती प्राप्त व्हावी यासाठी तो उपोषण करणार आहे. “मी आणि अंकित गांधी आम्ही येत्या दोन ऑक्टोंबरला उपोषण करणार आहोत. आम्हाला या आंदोलनासाठी गांधीजींचा आशिर्वाद हवा आहे. त्यामुळे आम्ही इंदिरा गांधी विमानतळावरुन राजघाट पर्यंत पदयात्रा करणार आहोत. तुम्ही देखील या उपोषणात सहभागी व्हा.” अशा आशयाची इन्स्टाग्राम त्याने लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.