वरुण धवन हा बॉलिवूडमधील आघाडिचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. वरुण लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘कुली नंबर १’ असं आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अवश्य पाहा – VJ ते प्रसिद्ध अभिनेत्री; ७ वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चित्राची आत्महत्या

‘हुस्न है सुहाना’ या गाण्यात वरुण धवन आणि सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दोघांचीही खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे क्लासिक गाणं १९९५ सालच्या कुली नंबर १ या चित्रपटातीलच आहे. या गाण्याला तनिष्क बागची यानं रिक्रिएट केलं आहे.

अवश्य पाहा – ‘अभिनव तर माझा आहे’; अर्शीने पतीसोबत केलेलं फ्लर्टिंग पाहून रुबिना संतापली

अवश्य पाहा – ‘तू गांजाची शेती करतेस का?’; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी प्रियांका होतेय ट्रोल

‘कुली नंबर १’ हा वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. कुली नंबर १ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर या नव्या रिमेकमध्ये वरुण धवन व सारा अली खान झळकणार आहेत.