26 February 2021

News Flash

सोनू सूदला सलाम! भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला दिली नोकरी

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिची नोकरी गेली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडानचा फटका बसलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहे. त्याने आंध्रप्रदेशमधील एका गरीब शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टर भेट म्हणून दिला आहे. आता सोनू सूदने लॉकडाउनमध्ये नोकरी गमावणाऱ्या एका तरुणीला मदत केली असल्याचे समोर आले आहे.

एका ट्विटर यूजरने सोनू सूदकडे मदत मागितली होती. त्याने ट्विटमध्ये सोनू सूद सर नमस्कार, ही शारदा आहे. जी एक इंजिनियर आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिची नोकरी गेली आहे. पण नोकरी गेल्यावरही ती खचून गेलेली नाही. तिने घर खर्चासाठी भाजी विक्रिचा व्यवसाय सुरु केला आहे. कृपयाला तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तिची मदत करा असे म्हटले आहे.

सोनू सूदने यूजरच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. ‘माझ्या अधिकाऱ्यांनी तिची भेट घेतली आहे. तिचा नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेण्यात आला आहे. तिला जॉब लेटरीही पाठवण्यात आले आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लॉकडाउनमध्ये सोनू सूदने मजदूर कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली. तो आणि त्याची संपूर्ण टीम कामगारांची मदत करत होते. तसेच काही दिवसांपूर्वी जॉर्जियामध्ये अडकलेल्या ५० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सोनू सूद मदत करत असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 4:57 pm

Web Title: hyderabad techie selling vegetables after losing job gets offer letter from sonu sood avb 95
Next Stories
1 अरबी चाहत्याने धर्मेंद्र यांना दिलं खास गिफ्ट; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क…
2 मदतीसाठी हृतिक पुन्हा सज्ज; १०० बॅकग्राऊंड डान्सरला केली आर्थिक मदत
3 बॉलिवूडला आणखी एक झटका; जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचं निधन
Just Now!
X