24 January 2020

News Flash

कार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन

भार्गवी आणि अनुशा या दोघी एका मालिकेचे चित्रीकरण संपवून परतत होते. कारमध्ये त्यांच्यासोबत चालक चक्री आणि आणखी एक व्यक्ती होता.

संग्रहित छायाचित्र

तेलुगू टीव्ही मालिकांमधील दोन अभिनेत्रींचे बुधवारी तेलंगणातील कार अपघातात निधन झाले. भार्गवी (वय २०) आणि अनुशा (वय २१) अशी या अभिनेत्रींची नावे आहेत.

भार्गवी आणि अनुशा या दोघी एका मालिकेचे चित्रीकरण संपवून परतत होते. कारमध्ये त्यांच्यासोबत चालक चक्री आणि आणखी एक व्यक्ती होता. अनंतगिरी येथील जंगलातील चित्रीकरण आटपून परतत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात भार्गवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अनुशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील अन्य दोघे जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भार्गवी ही तेलुगू टीव्ही मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर अनुशा ही नवोदित अभिनेत्री होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अभिनेत्री, अन्य कलाकार आणि प्रॉडक्शन टीम अनंतगिरी येथील जंगलात गेली होती. आगामी मालिकेतील काही दृश्यांचे या जंगलात चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण आटोपल्यानंतर या दोघी कारमधून घरी जाण्यासाठी निघाल्या. तिथून काही अंतरावर विकाराबाद येथे त्यांच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला धडक दिली असती. हा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली.

First Published on April 18, 2019 10:03 am

Web Title: hyderabad telugu tv actresses bhargavi anusha killed in road accident vikarabad
Next Stories
1 सोहा म्हणते …म्हणून मी मराठी चित्रपटांमध्ये काम करत नाही
2 छे! सलमानसाठी नव्हे, ‘या’ कारणासाठी केलं भारत चित्रपटामध्ये काम – कतरिना कैफ
3 सिद्धार्थ चांदेकर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला
Just Now!
X