08 July 2020

News Flash

अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हैदराबादमधील पापिरेड्डीगुडा गावात नागार्जुनचा फार्महाऊस असून तिथे कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. काही स्थानिक आणि जैविक शेती तज्ञ फार्महाऊसची पाहणी करत असताना त्यांना हा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पापिरेड्डीगुडा गावातील ४० एकर परिसरात नागार्जुनचं फार्महाऊस आहे. नुकतंच हे फार्महाऊस नागार्जुनने विकत घेतलं आहे. काही दिवसांपुर्वी नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत फार्महाऊसमध्ये आला होता. नागार्जुन १० दिवस कुटंबासोबत तिथेच होता. यावेळी त्यांनी परिसरात काही रोपं लावली होती.

आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी नागार्जुन जैविक शेती तज्ञांची मदत घेत आहे. फार्महाऊसची पाहणी करत असताना त्यांना एका बंदिस्त खोलीतून दुर्गंध येत असल्याचं जाणवलं. त्यांना खोली उघडून पाहिलं असता आतमध्ये एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांना आढळला.

हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा पोलीस शोध घेत असून बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती मिळवत आहेत. संबंधित व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केशमपेट पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:12 pm

Web Title: hyderabad tollywood actor akkineni nagarjuna farmhouse dead body found in sgy 87
Next Stories
1 VIDEO: अमेरिकन लष्कराने वाजवलं भारताचं राष्ट्रगीत
2 ‘हजारो गावकरी बुडत असताना एका व्यक्तीसाठी धरण भरले’; मेधा पाटकर मोदींवर संतापल्या
3 नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी अमित शाहंना भेटण्यास इच्छुक
Just Now!
X