22 February 2019

News Flash

प्रिया वरियरचं ते गाणं मुस्लीमांच्या भावना दुखावणारं? – हैदराबादमध्ये तक्रार

हैदराबादमधील फलकनुमा पोलिस स्थानकात ही तक्रार दाखल

प्रिया वारियर

एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. पण आता हिच प्रसिद्धी तिच्यावर एक वेगळे संकट घेऊन आली आहे. हैदराबादमध्ये मुस्लिम युवकांचा समुहाने प्रिया आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रियाच्या आगामी ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार काही मुस्लिम युवकांनी केली. सध्या प्रत्येक भारतीयाच्या तोंडी असलेल्या प्रियाच्या विरोधात हैदराबादमधील फलकनुमा पोलिस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केल्यानंतर त्यात पैगंबरांचा अपमान केल्याचे त्यांचे मत आहे.

मल्याळम अभिनेत्री प्रिया वरियर ही अगदी काहीच दिवसांमध्ये सोशल मीडियाची सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी झाली आहे. व्हेलेंटाइन वीकदरम्यान तिच्या ‘मनिक्य मलरया पूवी’ गाण्यातील एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये प्रिया तिच्या शाळकरी मित्राला नजरेच्या हावभावांनी प्रेम व्यक्त करताना दिसते. तिच्या याच हावभावांनी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला. नुकतेच तिचे ‘मनिक्य मलरया पूवी’ हे संपूर्ण गाणे प्रदर्शित करण्यात आले. शान रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे शाळेतील त्या पहिल्या प्रेमाची आठवण करुन दिल्याशिवाय राहत नाही. या व्हिडिओ २० तासांच्या आत ५० हजारांहून जास्त लाइक्स मिळाले. ‘मनिक्य मलरया पूवी’ गाण्याचे दिग्दर्शन ओमर लुलु यांनी केले आहे. एकाच दिवसात प्रियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. इन्स्टाग्रामवर एका दिवसात एवढे फॉलोवर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी झाली.

First Published on February 14, 2018 11:16 am

Web Title: hyderabad youth files fir against priya varrier and the producer of the viral song