News Flash

‘दबंग’ सलमानचा चाहता शाहिद!

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आज (शुक्रवार) 'फटा पोस्टर निकला हिरो' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

| September 20, 2013 11:16 am

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आज (शुक्रवार) ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. काही वर्षांपासून बॉलीवूडपासून दुरावलेला शाहिद या चित्रपटाने पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. राजकुमार संतोषीच्या ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटाने त्याला यश प्राप्त होते की नाही, हे तर तिकीटबारीवरील आकडेवारीनेच कळू शकेल.
शाहिदने चित्रपटात सलमानच्या चाहत्याची भूमिका केली आहे. एवढेच नाही तर तो वास्तवातही त्याचा चाहता आहे, असे तो एका पत्रकार परिषेदेदरम्यान म्हणला. तो ‘दबंग’ सलमानचा चाहता असल्यामुळे चित्रपटातील भूमिका करण्यात त्याला कोणताही अडथळा न आल्याचे त्याने यावेळी सांगितले. शाहिद म्हणाला की, आमच्या पिढीतील बहुतेकजण तिनही ‘खान’ कलाकारांचे चाहते आहेत. आम्ही त्यांचे चित्रपट बघत आलो आहोत आणि आता मला सलमानच्या चाहत्याची भूमिका करण्यास मिळाली होती. त्यामुळे मी या भूमिकेसाठी फार उत्सुक होतो.
३२ वर्षीय शाहिदला सध्या त्याची वेळ उत्तम नसल्याचे वाटते. त्यामुळे त्याचा ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपट त्याला यश प्राप्त करुन देतो की नाही ते आज कळेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 11:16 am

Web Title: i am a salman khan fan shahid kapoor
Next Stories
1 ‘खाना’वळ पेटली!
2 दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा
3 अनुराग कश्यपने चुकीच्या ट्विटसाठी मागितली माफी
Just Now!
X