News Flash

आदित्यला अजून प्रेम गवसलेच नाही!

‘आशिकी २’ प्रदर्शित झाला, त्या चित्रपटाने भरपूर पुरस्कार मिळवले, भरपूर पैसा कमावला आणि त्यामुळे या चित्रपटाची जोडी आदित्य रॉय कपूर-श्रध्दा कपूर यांनाही भूतो न भविष्यति

| September 6, 2014 12:37 pm

‘आशिकी २’ प्रदर्शित झाला, त्या चित्रपटाने भरपूर पुरस्कार मिळवले, भरपूर पैसा कमावला आणि त्यामुळे या चित्रपटाची जोडी आदित्य रॉय कपूर-श्रध्दा कपूर यांनाही भूतो न भविष्यति अशी लोक प्रियता मिळाली. तेव्हापासून आदित्य आणि श्रध्दा एकमेकांबरोबर आहेत. म्हणजे बऱ्याचदा ते दोघेच एकत्र फिरतात, एकमेकांच्या घरी रात्री उशिरापर्यंत असतात, एकत्र पाटर्य़ा करतात, एकत्र सिनेमे बघतात. त्यामुळे साहजिकच त्या दोघांचे प्रेमप्रकरण अगदी आलबेल सुरू आहे.. अशीच चर्चा रंगू लागली. मात्र, ‘दावत-ए-इश्क’ चित्रपटाच्या प्रसिध्दीत व्यग्र असलेल्या आदित्यने मला अजून प्रेम गवसलेलेच नाही.. असे सांगत या प्रेमप्रकरणातली हवाच काढून टाकली आहे.
‘आशिकी २’ नंतर आदित्य पुन्हा एकदा ‘दावत-ए-इश्क’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा त्याची नायिका आहे. आदित्य यात लखनवी तरुणाच्या भूमिकेत असल्याने तो एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याच्या या लूकबद्दल, चित्रपटाबद्दल श्रध्दाने त्याचे तोंडभरून कौतूक केले आहे. हा चित्रपट पहायची इच्छाही तिने व्यक्त केली आणि या चित्रपटातील सगळी गाणी विशेषत: ‘रंगरेली’ हे गाणे आपल्याला आवडत असल्याचे तिने ट्विटरवर जाहीरही केले. श्रध्दाच्या या कौतुकाबद्दल विचारल्यावर आदित्यने ती आपली सगळ्यात चांगली मैत्रीण असल्याचे म्हटले आहे. आमच्या दोघांबद्दल बरेच काही लिहिले, बोलले जाते. पण, एक कलाकार म्हटल्यावर तुमच्या बाबतीत अशा चर्चा-अफवा होत राहणारच. त्यात विचित्र वाटण्यासारखे काहीच नाही, असे स्पष्टीकरणही त्याने दिले आहे.
थोडक्यात काय ते दोघे कितीही एकत्र फिरले तरी त्यांच्यात कुठलेही प्रेमप्रकरण सुरू नाही, असे आदित्यचे म्हणणे आहे. मी एका नातेसंबंधात होतो. आणि तेच प्रेम आहे असे समजून चाललो होतो. पण, प्रत्यक्षात ते तसे नव्हते. त्यामुळे मी अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. एक ना एक दिवस माझ्यासाठी सुयोग्य असलेली व्यक्ति मला भेटेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. पण, म्हणून आपण त्याच एका व्यक्तिच्या शोधात निघालेलो नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे. प्रेम जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल.. सध्या तरी आपल्याला ‘आशिकी २’ नंतर प्रेक्षक वेगळ्या भूमिकेत कसे स्वीकारतात, याकडे लक्ष लागले असल्याचे आदित्यने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 12:37 pm

Web Title: i am yet to find love says aditya roy kapoor
Next Stories
1 सलमानला दिलासा नाही
2 गणपती विशेषः देवाचं आदरातिथ्य
3 गणपती विशेषः सार्वजनिक गणेशोत्सव आवडीचे
Just Now!
X