02 March 2021

News Flash

गोविंदा माझे आयडॉल! व्हायरल झालेल्या डान्सर काकांची प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या काकांनी मानले सगळ्यांचे आभार

गेल्या साधारण चार पाच दिवसांपासून एका काकांचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. गोविंदा स्टाईल डान्स करून या काकांनी धमाल उडवून दिली आहे. आप के आ जाने से या गाण्यावर हे काका डान्स करत आहेत. त्यांचा दुसरा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. संजीव श्रीवास्तव असे त्यांचे नाव आहे. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेकडे संजीव श्रीवास्तव यांनी आनंद व्यक्त केला आहे. माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि लोकांना तो इतका आवडेल असे वाटलेच नव्हते. मी १९८२ पासून नाच करतो. गोविंदा हे माझे आयडॉल आहेत असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. तसेच माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचे आणि तो आवडणाऱ्यांचे मी आभार मानतो असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 10:32 pm

Web Title: i cant believe my dance video has gone viral i thank everyone for the love and support says professor sanjeev srivastava
Next Stories
1 बेनामी संपत्तीची माहिती पुरवा, १ कोटी कमवा
2 अन्नछत्र चालवणाऱ्यांवर No GST चा कृपा प्रसाद
3 इंग्लंडमधल्या पहिल्या भारतीय हॉटेलच्या मेनूकार्डचा लिलाव, किंमत वाचून व्हाल थक्क!
Just Now!
X