28 September 2020

News Flash

‘करीना दररोज झोपण्यापूर्वी करते ही गोष्ट…’ सैफचा टीव्ही शोमध्ये खुलासा

एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर हे बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल आहेत. काही काळ एकमेकांना डेट करुन २०१२मध्ये ते दोघे लग्न बंधनात अडकले. त्यांनी ‘ओमकारा’, ‘टशन’, ‘कुरबान’ अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आता सोशल मीडियावर त्यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफने दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या सोशल मीडियावर करीना आणि सैफचा ‘कुरबान’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफला करीना विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये त्याला ‘झोपण्यापूर्वी करीना कोणती गोष्ट करते’ असा प्रश्न विचारला होता. सैफने दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू आले.

 

View this post on Instagram

 

Saif : i can’t tell you the last thing she does before going to bed

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

त्यावर सैफ विचार करुन उत्तर देतो. ‘ती रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना म्हणते’ असे सैफ म्हणाला.. तेवढ्यात करीना त्याला इशारा करुन काही तरी सांगते. त्यानंत सैफ म्हणतो, ‘ती झोपण्यापूर्वी टीव्ही पाहते’. त्यानंतर तो ‘पण ती रात्री झोपण्यापूर्वी शेवटची गोष्ट काय करते हे मी तुम्हाला नाही सांगू शकत’ असे म्हणतो. ते ऐकून तेथे बसलेल्या सर्वांना हसू अनावर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 12:21 pm

Web Title: i cant tell you the last thing kareena kapoor khan does before going to bed saif video viral avb 95
Next Stories
1 ‘ऑनस्क्रीन अबराम-आराध्याची जोडी ठरणार हिट’; शाहरुखच्या वक्तव्यावर बिग बींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
2 Video : पीपीई किट घालून ‘या’ अभिनेत्रीनं केला विमानप्रवास
3 ‘गुलाबो सिताबो’मधील बेगम ठरते लोकप्रिय; जाणून घ्या कोण आहेत त्या!
Just Now!
X