28 September 2020

News Flash

‘बेस्ट बॉयफ्रेण्ड’च्या टॅगसाठी मी पात्र- रणवीर सिंग

दीपिकाने रणवीरचे चुंबन घेतले घेतल्यापासून #bestboyfriend हा टॅग सोशल मिडियावर चालत होता

बेस्ट बॉयफ्रेण्डचा टॅग तू जिंकला आहेस असे विचारले असता रणवीर हसत म्हणाला की, त्यासाठी मी पात्र आहेच.

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून बॉलीवूडची आघाडीची जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकेल. या दोघांचे प्रेम दिवसेंदिवस बहरतानाचं दिसत आहे. नुकताचं दीपिका आणि रणबीर कपूरचा ‘तमाशा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला रणवीरनेही हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने रणवीरचे चुंबन घेतले होते. तेव्हापासून #bestboyfriend हा टॅग सोशल मिडियावर चालत होता.
.. आणि दीपिकाने घेतले रणवीरचे चुंबन
बेस्ट बॉयफ्रेण्डचा टॅग तू जिंकला आहेस असे विचारले असता रणवीर हसत म्हणाला की, त्यासाठी मी पात्र आहेच. रणवीरच्या या उत्तराने त्याच्या आणि दीपिकाच्या नात्याला अधिकृत पावती मिळाल्याचे म्हणावयास हरकत नाही. आता दीपिका तिच्या या बेस्ट बॉयफ्रेण्डविषयी कधी बोलतेय ते बघू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 1:06 am

Web Title: i deserve the best boyfriend tag says ranveer singh
Next Stories
1 ‘शासन’मध्ये फुलणार मनवा-जितेंद्रच प्रेम
2 ‘बाजीराव-मस्तानी’च्या प्रदर्शनात अडथळे; ‘पिंगा’, ‘मल्हारी’ गाणे वगळण्याची पेशवेंची मागणी
3 सलमान खानच्या ‘बीईंग सलमान’ चरित्राचे त्याच्या जन्मदिनी प्रकाशन
Just Now!
X