‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांत अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमी सतर्क असायचा. नुकताच सुशांतच्या फिटनेस कोचने सुशांतच्या निधनाची बातमी ऐकताच धक्का बसल्याचे सांगितले आहे.
सुशांतच्या फिटनेस कोचचे नाव सामी अहमद आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सामी सुशांतसाठी फिटनेस कोच म्हणून आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी सामीने नुकताच संवाद साधला. त्यावेळी त्याने सुशांत संबंधी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
View this post on Instagram
‘जेव्हा मी सुशांतच्या निधनाची बातमी ऐकली मला धक्काच बसला. एखाद्या वाईट स्वप्न असल्याचे मला वाटले. पण जेव्हा मी त्याच्या वांद्रे येथील घरी गेलो तेव्हा त्याचे निधन झाल्याचे मला काळाले. आमचं शेवटचं बोलणं १ जून रोजी झाले होते. माझ्या आईचे कर्करोगामुळे निधन झाल्यामुळे त्याने मला फोन केला होता आणि म्हणाला काही लागले तरी मला फोन कर. तसेच त्याने मला कुटुंबीयांची काळजी घेण्यास सांगितले’ असे सामी म्हणाला.
‘मला त्याच्या आयुष्यातील डिप्रेशन विषयी माहित होते पण आम्ही यावर कधी बोललो नाही. आम्ही वर्कआउटसोबत इतर गोष्टी करुन पुन्हा ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करत होतो. पण लॉकडाउनंतर आमचा ऐकमेकांशी संवाद झाला नव्हता. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा एकत्र वर्कआउट करायचो. आम्ही इतर गोष्टींवरही बोलायचो. आम्ही खासकरुन विज्ञान, ग्रह, तारे, त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल बोलायचो’ असे सामी पुढे म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 8:22 pm