25 May 2020

News Flash

चित्रपट परीक्षण मी वाचतच नाही – जॉन अब्राहम

मी चित्रपटांचे परीक्षण वाचत नाही, मी १३ वर्षांपूर्वीच वर्तमानपत्र बंद केले.

| September 2, 2015 11:32 am

मी चित्रपटांचे परीक्षण वाचत नाही, मी १३ वर्षांपूर्वीच वर्तमानपत्र बंद केले. हे सांगतो आहे अभिनेता जॉन अब्राहम. ‘वेलकम बॅक’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रचारासाठी तो मुंबईत बोलत होता.
अनिल कपूर व नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला वेलकम हा विनोदी चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. येत्या शुक्रवारी त्याचाच पुढचा भाग म्हणजेच वेलकम बॅक हा चित्रपट येत असून त्याचित्रपटात नसरुद्दीन शहा, अनिल कपूर, परेश रावल, नाना पाटेकर, डिंपल कपाडिया, श्रुती हसन आणि शायनी अहूजा यांच्यासह जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपटही विनोदी असल्याचे जॉन अब्राहमने सांगितले आहे.
विनोदी चित्रपट करणे हे अतिशय गांभीर्याने करण्याचे काम असून आम्ही सर्वांनीच या चित्रपटाकरता खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे परीक्षण वाचून मी त्यावर कधीच विश्वास ठेवत नाही. १३ वर्षांपूर्वीच माझ्या करिअरच्या सुरवातीला मी माझ्या घरी येणारे वर्तमानपत्र बंद करून टाकले असल्याचे जॉन अब्राहमने प्रसारमाध्यमांना सांगितले. समीक्षकांबद्दल कलाकारांना आदर असावाच, पण कोणता समीक्षक खरोखर समीक्षण करतो आहे, हे अनुभवाने मला ओळखता येते. प्रेक्षकांनी व माझ्या चाहत्यांनी मद्रास कॅफेनंतर माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. समीक्षक काय म्हणतात या गोष्टींवर प्रतिक्रीया देण्याचे मी बंद केले आहे. येत्या शुक्रवारी अनीस बाझमी यांनी दिग्दर्शित केलेला वेलकम बॅक प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना तो हसवेल अशी खात्री जॉन अब्राहमने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2015 11:32 am

Web Title: i dont read reviews john abraham on tackling criticism
Next Stories
1 अनोख्या भूमिका मिळत असल्याने सैफ आनंदीत
2 ‘कट्यार काळजात घुसली’तील शंकर महादेवनच्या गाण्यावर अमिताभ बच्चन फिदा!
3 पाहाः सई आणि तेजस्विनीच्या आवाजातील ‘अनप्लग तोळा तोळा’ गाणे
Just Now!
X