‘साईज झिरो’च्या प्रेमासाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूडमध्ये आपल्या डौलदार बांध्यासाठी टीकेची शिकार झालेली हुमा कुरेशी साईज झिरोला नकार देत आपल्या डौलदार बांध्यालाच पसंती देते. ‘गॅंग ऑफ वासेपूर’या हुमाच्या पहिल्याच चित्रपटातील तिचा डौलदार बांधा आणि नैसर्गिक शैलीतले रूप अनेकांना आवडले होते. तरी काही काळानंतर तिच्या वजनावरून चित्रपटसृष्टीत काहीजणांकडून टीकेचा सूर उमटू लागला.
हुमा म्हणाली, ‘गॅंग ऑफ वासेपूर’मध्ये मी एका प्रेमळ मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. ती एक आकर्षक भूमिका होती.  ‘एक थी डायन’ मध्ये मी अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. नेहमीच मी एका प्रेमळ मुलीची व्यक्तिरेखा सादर केली आहे. चित्रपटसृष्टीतील काही लोक ‘साईज झिरो’ला अवास्तव महत्त्व देत असल्याचे मला वाटते. आज चित्रपटसृष्टीत अंगकाठीने जास्त बारीक नसलेल्या अभिनेत्री देखील आहेत. ‘साइज झिरो’च्या तुलनेत मला एक अभिनेत्री म्हणून माझे सध्याचे व्यक्तिमत्व खूप आवडते.