01 March 2021

News Flash

कोणे एकेकाळी मनिषाही होती संजूच्या प्रेमात !

'संजू' चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका साकारत असलेली मनिषा कोईराला कोणे ऐकेकाळी संजय दत्तवर फिदा होती.

'संजू'

‘ ३०८ गर्लफ्रेंड थी मेरी’ असं म्हणणाऱ्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्तवर कोणे ऐकेकाळी मनिषा कोईरालादेखील फिदा होती. मनिषानं नुकतंच एका मुलाखतीत तिला संजय दत्त आवडायचा याची कबुली दिली आहे. मनिषा या चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका साकारत आहे. संजय आई नर्गिस यांच्या खूपच जवळ होता. त्यामुळे नर्गिस आणि संजयमधलं हे नातं ‘संजू’ चित्रपटाच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मनिषानं आपल्याला संजय दत्त खूपच आवडाचा याची कबुली दिली आहे. मनिषा आणि संजयनं ‘बाघी’, ‘मेहबूबा’, ‘ख्वाफ’ यांसारख्या अनेक चित्रपटातून काम केलं आहे. ‘ मी शाळेत असल्यापासून मला संजय दत्त प्रचंड आवडायचा. बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांपैकी मला संजय दत्तचं काम जास्त आवडायचं. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर मला संजय दत्तसोबत काम करण्याची संधी मिळाली. सेटवर तूला मी आवडत नाही का? असं मस्करीत संजय अनेकदा विचारायचा, मात्र आम्ही थट्टा मस्करीत हा विषय घ्यायचो’ असं मनिषानं कबुल केलं.

संजय मनानं खूपच चांगला माणूस आहे मात्र आयुष्यात त्यानं खूप चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला त्यामुळे आयुष्यात खूप मोठे चढउतार त्यानं पाहिले आहेत. त्यानं खूप काही सहन केलं आहे असंही मनिषा म्हणाली. केवळ मैत्रीसाठी आपण हा चित्रपट केला असंही मनिषा म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 12:06 pm

Web Title: i had major crush on sunjay dutt said manisha koirala sanju
Next Stories
1 बापरे ! अर्जुन कपूरला मिळालंय धमकीचं पत्र!
2 Sanju : प्रदर्शनापूर्वीच ‘संजू’ चित्रपट झाला लीक
3 संजयला भेट देण्यासाठी दिया मिर्झानं दीड लाखांत खरेदी केलं ‘मदर इंडिया’चं पोस्टर
Just Now!
X