04 June 2020

News Flash

नवाजुद्दीन सिध्दिकीकडून खूप काही शिकलो – वरुण धवन

'स्टुडण्ट ऑफ दी इअर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या वरुण धवनने 'बदलापूर' या आगामी चित्रपटाद्वारे वेगळ्या वळणाची वाट चोखाळली आहे.

| January 9, 2015 05:12 am

‘स्टुडण्ट ऑफ दी इअर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या वरुण धवनने ‘बदलापूर’ या आगामी चित्रपटाद्वारे वेगळ्या वळणाची वाट चोखाळली आहे. याच चित्रपटातील ‘जी करदा…’ गाण्याचा अनावरण सोहळा गुरुवारी पार पडला. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या वरुणला नवाजुद्दीनबरोबरच्या कामाच्या अनुभवाबाबत विचारले असता, सिनेमाविषयी नवाझकडून आपण खूप काही शिकल्याचे आणि एक व्यक्ती म्हणून त्याची चांगली ओळख झाल्याचे त्याने सांगितले. नवाझविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, नवाझ प्रसिध्दीपासून स्वत:ला दूर ठेवतो. तो केवळ असामान्य अभिनेता नसून, एक चांगला माणूसदेखील आहे. या चित्रपटाचा तो एक भाग असल्याचे मला समाधान आहे. चित्रपटातील तो महत्वाचा भाग असल्याने हा चित्रपट त्याच्याशिवाय अपुरा आहे. ‘बदलापूर’ चित्रपटात वरुण एका आक्रमक तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. २० फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात यामी गौतम, हुमा कुरेशी यांच्यादेखील भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 5:12 am

Web Title: i have learnt a lot from nawazuddin siddiqui varun dhawan
Next Stories
1 चित्रपटात काम करण्यापेक्षा मातृत्त्वाचा आनंद घेण्यात अधिक रस – शिल्पा शेट्टी
2 करीनाचे छायाचित्र वापरल्यामुळे वाद?
3 CELEBRITY BLOG : आनंदात नफा शोधण्याचं तंत्र!
Just Now!
X