02 March 2021

News Flash

माझी बायको मला जोड्याने मारते- संजय दत्त

हे शूज खास मेक्सिकोवरुन तयार करून आणले आहेत

अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या ‘भूमी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्याच्या यशासाठी तो सध्या दिवस- रात्र एक करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमात त्याने पत्नी मान्यताच्या ‘दबंगगिरी’बद्दल सांगितले आहे. ‘माझ्याकडे खूपच चपला आहेत. त्यांनीच ती मला मारते, असे त्याने सांगितले.

‘भूमी’ सिनेमाद्वारे संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्याचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. एका कार्यक्रमात त्याने आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडला आहे. संकटकाळात धीर देणाऱ्या मान्यताबाबत तो भरभरून बोलला. मान्यतासोबत संसार करताना घडलेला एक किस्सा सांगितला. थट्टामस्करीत त्याने अनेक धक्कादायक किस्से सांगितले. पत्नी मान्यता मला जोड्याने मारत असे, असे त्याने सांगितले.

‘झूम’ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत संजय म्हणाला की, माझ्याकडे काही कस्टममेड शूजही आहेत. हे शूज आग्र्याचा मोची तयार करू शकणार नाही. हे शूज खास मेक्सिकोवरुन तयार करून आणले आहेत. मला हा मोची शोधण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. शूजसाठी लेदर न वापरता प्लॅस्टिक वापरण्यात आले आहे. ‘बॅक अॅट दी रॅन्च’ या दुकानातून मी हे शूज खरेदी करतो. तेथील लोक मला शूजशी निगडीत कॅटलॉग पाठवतात, त्यात पाहून मला कशापद्धतीचे शूज हवे आहेत ते मी सांगतो. माझ्याकडे हॅण्डमेड असे अनेक शूज आहेत, ज्याचा उपयोग मान्यता मला मारण्यासाठी करते.

संजू बाबाने हे मस्करीत सांगितले असले तरी यामुळे संजूबाबाच्या आयुष्याशी निगडीत एक नवीन गोष्ट आपल्याला कळली हे नक्की. वास्तविक संजूबाबा आणि मान्यता एकमेकांवर खूप प्रेम करतात. मान्यता नेहमीच संजूबाबासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. मान्यताने नेहमीच संजयच्या कठीण काळात त्याला साथ दिली आहे. त्यामुळेच त्यांच्यातले हे प्रेम उत्तरोत्तर वाढत गेले असे म्हणावे लागेल.

संजय दत्तचा ‘भूमी’ हा बहुचर्चित सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. या सिनेमात संजयने एका पित्याची भूमिका साकारली असून अदिती राव हैदरी हिने त्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमात सेन्सॉर बोर्डाने १३ सीन्सना कात्री लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 6:10 pm

Web Title: i have many shoes which my wife hits me with sanjay dutt jokes about manyata on tv show
Next Stories
1 करिश्मा स्टाईलने करिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
2 PHOTO : राखी सावंतचे राम रहिमसोबत फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का
3 PHOTO : जब काजोल मेट युवराज सिंग
Just Now!
X