News Flash

शेवटची दोन वर्षंच राहिली आयुष्याची- केआरकेचा धक्कादायक खुलासा

आजारपणाबद्दल कमाल खानचा मोठा खुलासा

कमाल खान

वायफळ बडबड आणि वादग्रस्त ट्विटमुळे स्वयंघोषित समीक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याचीच चर्चा असून याचे कारण आहे, त्याने ट्विटरवर पोस्ट केलेलं प्रसिद्धी पत्रक. मला पोटाचा कर्करोग असून एक ते दोन वर्षच जगू शकतो अशी धक्कादायक माहिती कमाल खानने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

‘मला पोटाचा कर्करोग असून तो तिसऱ्या स्टेजला असल्याचं निदान झालं आहे. मी फक्त एक ते दोन वर्षच अजून जगू शकतो, असं मला वाटतं. मला कोणाचीही सहानुभूती नकोय. त्यामुळे मी आता कोणाचा फोनही उचलणार नाही आणि मी या जगातून लवकरच जाणार असल्याबद्दल कुणाला दु:खही व्यक्त करू देणार नाही. जे लोक माझा अजूनही तिरस्कार करतात, त्यांचा मी आदर करतो. माझ्या दोन इच्छा अपूर्णच राहतील म्हणून मी निराश आहे. एक म्हणजे मला ए ग्रेड चित्रपटाची निर्मिती करायची आहे. दुसरं म्हणजे मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे. मात्र या दोन्ही इच्छा आता माझ्यासोबतच कायमस्वरूपी मरणार आहेत. मी आता जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबीयांसोबतच व्यतित करणार आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करा किंवा माझा तिरस्कार करा, माझं तुमच्यावर नेहमीच प्रेम असणार आहे,’ असं केआरकेनं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी कमालचा ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आला होता. त्यानंतर केआरके बॉक्स ऑफीस या नव्या ट्विटर अकाऊंटवर तो सक्रीय आहे. याच अधिकृत अकाऊंटवर त्याने हे प्रसिद्धी पत्रक पोस्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 11:50 am

Web Title: i have stomach cancer and will be alive for 1 or 2 years more reveals kamaal r khan
Next Stories
1 बिग बींच्या फोनचं मध्यरात्री अचानक गेलं नेटवर्क, म्हणाले…
2 VIDEO : ऑनस्क्रीन धोनीचं आलिशान घर पाहिलं का?
3 चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रीवरच कुत्रा पिसाळला अन्…
Just Now!
X