News Flash

सोनमचा भावाला दिलेला हा सल्ला ऐकून तुम्हीही व्हाल चकित

सोनम आणि तिची बहिण रियाने हर्षच्या आयुष्यात आलेल्या मुलींवरही टिपणी केली

सोनम कपूर भाऊ हर्षवर्धनसोबत

अभिनेत्री नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या भावाला एक आगळा वेगळा सल्ला दिला. तिच्या या सल्ल्यामुळे ती परत एकदा चर्चेत आली आहे. हर्षवर्धनला सोनमने जो सल्ला दिला, त्याचे रिया कपूरनेही समर्थन केले. सोनमने हर्षवर्धनला सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. शोमध्ये सोनमने हर्षवर्धनच्या सेक्सबद्दल खूप चर्चा केली. हर्षवर्धनबद्दल बोलताना सोनम म्हणाली की, हर्षवर्धनला कशा मुली आवडतात. मुलींच्या आवडीबाबत त्याची निवड अतिशय वाईट आहे. मी त्याला हे त्याच्यासमोर नाही सांगू शकत. त्याने ठरवलं आहे की माझ्या आणि रियासारख्या मुलींबरोबर तो कधीच राहू शकत नाही.

या शोमध्ये सोनम आणि तिची बहिण रियाने हर्षच्या आयुष्यात आलेल्या मुलींवरही टिपणी केली. त्या म्हणाल्या, ‘त्या गोड आहेत, पण थोड्या विचित्रही आहेत. पण त्याला यांच्याहून अधिक चांगल्या मिळू शकतात. मुलींच्या बाबतीत त्याची आवड एवढी वाईट का आहे?’ यावेळी हर्षला सल्ला देताना या दोन्ही बहिणींनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की सेक्स करताना तू योग्य ती काळजी घेत असशील.
हर्षने नुकताच राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘मिर्झिया’ हा सिनेमा केला. या सिनेमातूनच सयामी खेर आणि हर्षवर्धन कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर पाहिजे तेवढी कमा करु शकला नाही. या सिनेमातील सयामी खेरच्या अभिनयाचे कौतूक केले जात आहे. पण हर्षवर्धनच्याबाबतीत तसे पाहायला मिळत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 7:40 pm

Web Title: i hope harsh is using protection sonam kapoor talks about brothers sex life
Next Stories
1 मिथुन चक्रवर्तीची तब्येत खालावली, उपचारासाठी अमेरिकेत रवाना
2 ..या चित्रपटाचे पाकिस्तानमधील चित्रीकरण रद्द
3 लवकरच रणबीरचे ब्रेकअप प्रेक्षकांसमोर होणार उघड
Just Now!
X