कपिल वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर सुरू असलेल्या आरोपांचं आणि वादाचं चक्र काही केल्या थांबतच नाहीये. गेल्या आठवड्यात कपिलनं ट्विटरवर काही पत्रकारांना शिवीगाळही केली होती. नुकताच एका मुलाखतीत त्यानं मी काय करतोय हे मला पूर्णपणे ठावूक आहे असं म्हटलं आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबतीत ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याचं मला आता काहीच वाटत नाही. ज्यांना माझं करिअर उद्धवस्त करायचं आहे ते माझ्याबाबतीत अशाच अफवा पसरवत जातील. या सगळ्या गोष्टी मला काही नव्या नाहीत. त्यांना जे हवं ते करू दे. माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवून त्यांना समाधान मिळतं. मी काय करतोय हे मला चांगलच माहितीये’ असं कपिल ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

वाचा : ‘कोणत्याही क्षणी कपिल आत्महत्या करु शकतो’, एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

इंग्रजी वेबसाइट स्पॉटबॉयचे विकी लालवानी यांनी बुधवारी कपिलविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. कपिलकडून त्यांना शिवीगाळ केल्याची आणि धमकावल्याची तक्रार त्यांनी पवई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय. तर दुसरीकडे पूर्वाश्रमीची प्रेयसी प्रिती आणि सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत सुरू असलेल्या वादामामुळेही कपिल काहीसा नैराश्येत सापडला आहे. सात महिन्यांनंतर कपिलनं छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. २५ मार्चला त्याच्या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला. पण वारंवार शूट कॅन्सल झाल्यानं त्याचा हा नवाकोरा शो महिनाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचं समजत आहे. चॅनेलवर शो दाखवण्यासाठी त्याचे भागच चित्रीत झाले नाहीत, तसेच कपिलही सततच्या अफवांमुळे नैराश्येत सापडला आहे म्हणून हा शो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.