News Flash

हिरोंच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले ३० सिनेमे – मल्लिका शेरावत

मागे वळून पाहते तेव्हा ते लोक मला मूर्ख वाटतात असेही मल्लिकाने म्हटले आहे

अभिनेत्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे मी एक दोन नाही तर तब्बल ३० चित्रपट गमावले असल्याचा सनसनाटी आरोप अभिनेत्री मल्लिका शेरावतने केला आहे. ज्या अभिनेत्यांसोबत मला भूमिका देण्यात आली ते मी ती भूमिका करते आहे हे पचवू शकले नाहीत. त्याचमुळे त्यांनी या गोष्टीत ढवळाढवळ करून मला रिप्लेस करत स्वतःच्या गर्लफ्रेंड्सना त्या भूमिकेत आणलं असंही मल्लिका शेरावतने म्हटलं आहे.

मल्लिकाला घेऊ नका, ती खूप बडबडते. मल्लिका अनेक मतप्रदर्शन करते असं सांगत मला भूमिका नाकारण्यात आल्या असंही मल्लिका शेरावतने म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत. आता मागे वळून पाहताना मला वाटते की ते लोक मूर्ख आहेत असंही  मल्लिकाने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

#saturdayswag #saturdayvibes #saturdaymorning

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

मी जेव्हा सामाजिक बाबतीत मतप्रदर्शन केले तेव्हा माझी मतं कुणीही गांभीर्यानं घेतली नाहीत. आपल्या समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही असंही मल्लिकाने म्हटलं आहे. मी जेव्हा महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बॉलिवूडमधल्या काही जणांनी मला नावं ठेवली. एवढंच काय काही जणांनी तर मी देशभक्त नाही असंही म्हटलं. मात्र माझं माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे. सध्याचा देशातला काळ हा अभिनेते, कलावंतांसाठी सुवर्णकाळ आहे तुम्ही तुमचं मत अगदी ठामपणे मांडू शकता ही खरोखर चांगली बाब आहे असंही मल्लिकाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:28 pm

Web Title: i lost 30 films becasuse male actors replaced me with their girl friends says mallika sherawat scj 81
Next Stories
1 चीनमध्ये मराठमोळ्या अक्षयच्या ‘त्रिज्या’चा डंका !
2 Article 15 movie review: ‘फर्क बहुत कर लिया, अब फर्क लाएंगे’..
3 डॉ. काशीनाथ घाणेकर; गुरूजी म्हणतात… नाणं खणखणीत वाजतंय!
Just Now!
X