27 September 2020

News Flash

माझी प्रकृती उत्तम, चिंता करण्याचे कारण नाही- कमल हसन

खाण्यातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आपली प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे काही कारण नसल्याचा संदेश आपल्या चाहत्यांना देऊ

| September 17, 2014 12:49 pm

खाण्यातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आपली प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे काही कारण नसल्याचा संदेश आपल्या चाहत्यांना देऊ केला आहे.
“काही जण मी रुग्णालयात दाखल झाल्यापासून चर्चेचे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील याची कल्पना मला आहे पण, त्यांच्यासाठी खेदजनक बाब आहे. कारण, असे चिंता करण्यासारखे काहीच कारण नाही. माझी प्रकृती उत्तम आहे. अतिशय किरकोळ समस्येमुळे मी रुग्णालयात दाखल झालो.” असे कमल हसन यांनी चेन्नईतील रुग्णालयातून दूरध्वनीवरून संदेश देऊ केला.
“केरळमधील ज्या ठिकाणी आमचे चित्रीकरण सुरू आहे. तेथे चांगले हॉटेल्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे जवळच्या ढाब्यावरच जेवण घ्यावे लागले आणि त्यात पाण्याची चव बदलल्याने पोट दुखीचा त्रास सुरू झाला. म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो.” असेही कमल हसन यांनी सांगितले. कमल हसन सध्या ‘दृष्यम’ चित्रपटाचा तामिळ रिमेक असणाऱ्या ‘पापनाशम’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2014 12:49 pm

Web Title: i m fine no cause for alarm kamal haasan from hospital
टॅग Kamal Haasan
Next Stories
1 ‘बँग बँग’च्या शीर्षकगीतात दिसणार हृतिक आणि कतरिनाचा दिलखेच अविष्कार
2 ‘मैं हूं रजनिकांत’च्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाची स्थगिती
3 आशुतोष गोवारीकर यांच्या टीव्ही शोला ए. आर. रेहमान यांचे संगीत
Just Now!
X