News Flash

तापसी-कंगना वादाला अखेर पूर्णविराम; अभिनेत्रीने घेतली माघार

"आता हे सर्व गुंतागुंतीचं होत चाललंय"

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना रणौत व तापसी पन्नू या दोन अभिनेत्रींमध्ये वाद सुरू झाला आहे. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसीला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून हिणवलं होतं. त्यानंतर तापसीनेही तिला सडेतोड उत्तर दिलं. मात्र हा वाद आणखी पेटण्याची शक्यता असतानाच तापसीने या वादातून काढता पाय घेतला आहे. आपण कुठल्या विषयावर भांडतोय हे विसरण्याआधीच हा वाद मला संपवायचाय, असं तापसी म्हणाली.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

“अरे? तर आता याचा शेवट कसा करायचा? कोण इनसाईड आणि कोण आऊट साईड यावर भांडण करायचं का? आता हे सर्व गुंतागुंतीचं होत चाललं आहे. आपण कशावर भांडतोय हे विसरण्याआधीच या वादावर मी पडदा टाकते.” अशा आशयाचं ट्विट तापसीने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अवश्य पाहा – “ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा

काय म्हणाली होती कंगना?

“या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असं कंगना या मुलाखतीत म्हणाली होती.

तापसीचं कंगनाला प्रतुत्तर

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने कंगनाच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. “करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही. मी तर त्याला हाय, हॅलो, थँक्य यू संवादाशिवाय ओळखतसुद्धा नाही. माझं अस्तित्व माझ्या दिसण्यावरून आहे असा विचार मी अजिबात करत नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी दर वर्षी किमान चार चित्रपटांत काम केलंय. नुकतीच माझ्या पाच आगामी चित्रपटांची घोषणा झाली. कोण म्हणतंय की मला काम मिळत नाही? मी कंगनाची साथ देत नाही म्हणून ती आणि तिची बहीण माझ्यावर असले आरोप करतेय. माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच चित्रपटांची निर्मिती कंगना म्हणते त्या माफिया गँगने केली नाही. आगामी चित्रपटसुद्धा त्यांच्यासोबत करत नाहीये. मग माझं अस्तित्व हा घराणेशाहीचा पुरावा कसा असू शकतो? स्वत:च्या स्वार्थासाठी मी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा उचलू शकत नाही. या इंडस्ट्रीने मला माझी ओळख आणि पोट भरण्यासाठी खूप काही दिलंय. त्यामुळे या इंडस्ट्रीसोबत मी इतक्या कटू पद्धतीने वागू शकत नाही”, असं उत्तर तापसीने दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 5:06 pm

Web Title: i m gonna sign out taapsee pannu kangana ranaut mppg 94
Next Stories
1 Video : वयाच्या २७व्या वर्षी बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचलेल्या दिग्दर्शकाचा प्रवास
2 भालेराव कुटुंब येतंय तुमच्या भेटीला
3 श्री गुरुदेव दत्त साकारल्यानंतर आता मंदार जाधव दिसणार नव्या रुपात
Just Now!
X