News Flash

“…म्हणून ऋषी कपूर यांना भेटायला रुग्णालयात गेलो नाही”; बिग बींनी केला खुलासा

अमिताभ बच्चन यांनी दिलं स्पष्टीकरण

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका इन्स्टाग्राम ब्लॉगच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऋषी कपूर रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना पाहण्यासाठी बिग बी का गेले नव्हते? याचे स्पष्टिकरण देखील या ब्लॉगमध्ये देण्यात आले आहे.

काय म्हणाले अमिताभ?

“ऋषी कपूर यांना त्यांच्या देवनारच्या घरी मी पहिल्यांदा पाहिलं होतं. मला राज कपूर यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं, त्यावेळी त्यांना भेटलो होतो. ते अत्यंत उर्जावान होते. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, हालचालीतून उत्साह झळकायचा. त्यावेळी ते ‘बॉबी’ चित्रपटाची तयारी करत होते. त्यानंतर अनेक चित्रपटांदरम्यान त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्यामुळे भोवतालचं वातावरण सकारात्मक राहायचं. त्यांना पाहून पृथ्वीराज कपूर आठवायचे. ते नेहमीच आम्हाला हसवायचे.”

सर्वाधिक पाहिले गेलेले फोटो – ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट ते कलर… कधीही न पाहिलेले ऋषी कपूर!

 

View this post on Instagram

 

… in Memoriam https://tmblr.co/ZwrX5vYFTdCL4y00 had seen him at his home Deonar Cottage, Chembur , a young energetic, bubbly , mischief in his eyes Chintu , on those rare moments when I was privileged to have been invited to an evening at Raj ji’s house .. I would see him more often after , at RK Studios, when he trained as an actor for his film to be made, BOBBY .. a diligent enthusiastic youngster, ready to pounce onto every learning that came his way, in that famous large and legendary make up room, of Raj ji at the end of the first floor corridor of make up rooms .. He had a walk that was confident and determined .. a stride and style that was similar to that of his grandfather, the legendary Prithvi Raj ji .. a walk I had noticed in one of his earlier films .. that walk .. I never found it in any other .. We worked in several films together .. When he spoke his lines, you believed every word of it .. there was never an alternative .. its genuineness was beyond question .. And there has never been any other, that could lip sync a song as perfectly as he did .. never .. His playful attitude on set was infectious .. even in the most grave sequences he would discover that comedic spark and we would all just crack up .. !! Not just on set .. if you were with him at any formal event , he would find that little distractive light hearted gem to expand on and lighten the situation .. When there was a time lapse as the shot got readied , he would bring out his playing cards , or at times pull out his rather complicated Bagatele board and invite others to play .. a competition .. not just for fun .. a serious competition .. During his time of diagnosis and his treatment he never ever lamented his condition .. it was always .. ‘see you soon , just a routine visit to the Hospital .. I’ll be back shortly ‘ Joie de vivre .. the exuberant enjoyment of life , was a gene he inherited from his father .. the Legend, the Ultimate Showman the Iconic Raj Kapoor .. I never visited him in Hospital .. I never wanted to see distress on his smiling cherubic face .. But I am certain .. when he went , he must have gone with a gentle smile …

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

“या हसत्या खेळत्या चेहऱ्याला रुग्णालयात जाऊन पाहण्याची हिंमत कधी झालीच नाही. किंबहूना उपचार घेत असताना त्यांना होणारा त्रास मी पाहू शकलो नसतो. मी ऋषी कपूर यांना आजवर कधीच निराश अवस्थेत पाहिलं नव्हतं. ते एक प्रेरणादायी व्यक्तमत्व होतं. मला खात्री आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सभोवतालचं वातावरण उत्साही ठेवलं असणार.” अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी लिहिली आहे.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून त्यांनी अऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 12:30 pm

Web Title: i never visited rishi kapoor in hospital amitabh bachchan explains mppg 94
Next Stories
1 ऋषी कपूर यांच्या मुलीनं व्हिडीओ कॉलद्वारे पाहिले अंत्यसंस्कार, म्हणून आलियाच्या हाती होता मोबाइल
2 विराटशी लग्न करण्यासाठी अनुष्काने दिला होता नकार; कारण…
3 अनिल कपूर यांना अश्रू अनावर; म्हणाले, ‘तुझ्याशिवाय…’
Just Now!
X