‘बेबी डॉल’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली गायिका कनिका कपूर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. लंडहून परतलेल्या कनिकाला करोना विषाणूची लागण झाली. मात्र ही बातमी तिने इतरांपासून लपवून ठेवली. यामुळे तिच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. अगदी बॉलिवूड अभिनेता कमाल खानने तर “तिला शौचालयात बंद करा” अशी मागणी केली आहे

काय म्हणाला कमाल खान?

“मी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो, की कनिका कपूरला शौचालयात बंद करा. ती लगेच बरी होईल. ती १०० टक्के या उपचाराला पात्र आहे.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

कनिका कपूर सध्या लखनऊ येथील संजय गांधी पीजीआयएमएस या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मात्र तिथेही तिने आपला तोरा कायम ठेवला आहे. रुग्णालयात VVIP ट्रिटमेंटसाठी ती डॉक्टरांशी हुज्जत घालत आहे. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.