उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा नुकताच एक फोटो प्रसिद्ध झाला होता.  या फोटोमुळे अनंत अंबानीने अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. अतिलठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या अनंत अंबानीने चक्क १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवलं आहे. त्याच्या या नव्या लूकची खुद्ध सलमान खानने प्रशंसा केली आहे.
सलमानने अनंतसाठी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, अनंत अंबानीला पाहून खूप आनंद झाला. १८ महिन्यात १०८ किलो वजन कमी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. मला त्याचा आदर वाटतोय. याचसोबत सलमानने अनंतसोबतचा सेल्फीदेखील ट्विट केला आहे. भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यानेदेखील शिस्त आणि निर्धाराने अनंतने वजन कमी केल्याबद्दल त्याची प्रशंसा केली.


मुकेश अंबानी आणि निता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी गेल्या दीड वर्षापासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील होता. अनंतने कोणत्याही औषधांचा आधार न घेता अथक परिश्रम आणि व्यायाम करून १०८ किलो वजन कमी केले. आणि हा चमत्कार त्याने फक्त १८ महिन्यांत करून दाखवला आहे. दररोज पाच ते सहा तास व्यायाम करून डायट केल्यानं त्याला आपले वजन कमी करणे शक्य झाले.