20 September 2020

News Flash

आझाद सामान्य आयुष्य जगेल-किरण राव

चित्रपट निर्माता व अभिनेता अमिर खानची पत्नी किरन रावला त्यांचा दीड वर्षांचा मुलगा आझादचे बालपण इतर मुलांसारखे सामान्य असावे असे वाटते. अमिर व किरन १

| June 15, 2013 06:10 am

चित्रपट निर्माता व अभिनेता अमिर खानची पत्नी किरन रावला त्यांचा दीड वर्षांचा मुलगा आझादचे बालपण इतर मुलांसारखे सामान्य असावे असे वाटते. अमिर व किरन १ डिसेंबर २०११ ला या बाळाचे पालक झाले. ‘सरोगेट’ मातेच्या पोटी या बाळाचा जन्म झाला आसून, या बाळाच्या गर्भधारणेमध्ये ‘इन-व्हीट्रो फर्टीलायझेशन’चा उपयोग करण्यात आला होता. अमिर आणि किरन यांनी त्यांच्या बाळाचे नाव अमिरचे पणजोबा अबुल कलाम आझाद यांच्या नावावरून ‘आझाद राव खान’ असे ठेवले आहे.
“मी आझादची खूप काळजी घेत असून, एका मोठ्या स्टारचा मुलगा असल्यामुळे त्याचे जग वेगळे न होऊ देण्यावर माझा भर राहणार आहे. आझाद एका प्रसिध्द पित्याचा मुलगा असला तरी, त्याच्या जिवनामध्ये सामान्यपणा आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.”, असे किरन पीटीआय सोबत बोलताना म्हणाली.
मी आमच्या ‘खाजगी आयुष्याबद्दल’ खूप काळजी घेते असं किरन म्हणते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 6:10 am

Web Title: i want azad to have a normal life says kiran rao
टॅग Entertainment News
Next Stories
1 माझा मुलगा जियाच्या योग्यतेचा नव्हता – झरीना वहाब
2 जियाच्या आत्महत्येने उजेडात आणली बॉलिवूडची काळी बाजू
3 ‘कमलू हॅपी हॅपी’द्वारे गोविंद निहलानी अ‍ॅनिमेशनपटाकडे
Just Now!
X