News Flash

मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण..

'इश्क इन पॅरीस' चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

नुकतेच लॅक्म फॅश विक २०१७ सुरु झाले असून यात प्रितीने डिझायनर संजुक्ता दत्तासाठी रॅम्पवॉक केला.

बॉलीवूडमध्ये गालावर पडणा-या खळीसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा शेवटची २०१३ साली एका पूर्ण भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता लवकरच ती सनी देओलसोबत ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण करत असलेल्या या अभिनेत्रीने लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण, केवळ पती जेन गुडइनफमुळे आपण पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रितीने म्हटले आहे.

नुकतेच लॅक्म फॅश विक २०१७ सुरु झाले असून यात प्रितीने डिझायनर संजुक्ता दत्तासाठी रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधत तिचे आगामी चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दल चर्चा केली. यावेळी तिला काही प्रश्नही विचारण्यात आले. तुझी पहिलीच निर्मिती असलेल्या ‘इश्क इन पॅरीस’ या चित्रपटात तू शेवटची झळकली होती. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यामुळे आता पुनर्पदार्पण करताना तुझ्यावर दडपण आहे का? असा प्रश्न केला असता ती म्हणाली की, मला अजिबात दडपण नाहीये कारण ही माझी निर्मिती नाही. एखाद्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची पहिली निर्मिती असलेला चित्रपट पडला तर ठीक आहे. मला अजूनही त्याचा अभिमान आहे. तुम्ही यशापेक्षा तुमच्या चुकांमधून जास्त शिकता असे मला वाटते.

preity-goodenough3-759

प्रितीने केवळ चित्रपटांमध्येच नाही तर आयपीएल मॅचमध्येही तिचे नशीब आजमवले. त्यामुळे चित्रपट आणि व्यवसाय (आयपीएल) यांच्यामध्ये तू गेल्या वर्षभरात लग्न झाल्यानंतर कसे संतुलन राखलेस असे विचारले असता प्रिती म्हणाली की, मी काही अशी एकमेव स्त्री नाही. अशा लाखो महिला तुम्हाला मिळतील ज्या घर आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखतात. केवळ अभिनेत्री नसल्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. खरं तर या जगातील सर्वात कठीण काम म्हणजे हाउसवाइफ असणं आहे. २४ तास काम करूनही त्यांच कौतुक होत नाही. पण, आमच्या सारख्या व्यावसायिकांचे त्यांच्या कामात कौतुक केले जाते. एक सामान्य स्त्री तर सुपरवुमन असते, असेच मी म्हणेन. त्या घर आणि काम दोन्ही उत्तमरित्या सांभाळतात. माझ्यासाठी हे सरळ आहे की, माझं लग्न झालंय, काम करतेय आणि मी खूश आहे. मी एका अशा व्यक्तिशी लग्न केलंय ज्याने मला स्वतः चित्रपट करण्यासाठी पुन्हा ढकललंय. मी तर चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तरी मी ‘भैय्याजी सुपरहिट’ व्यतिरीक्त कोणताही चित्रपट करत नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:55 pm

Web Title: i wanted to quit bollywood but husband pushed me back says preity zinta
Next Stories
1 अक्कीच्या ‘हरे कृष्णा हरे राम..’ गाण्याची ‘कमांडो’ने केली कॉपी?
2 ‘रईस’ डॅडींच्या चित्रपटावर मुलांनी दिला रिव्ह्यू
3 Baghtos Kay Mujra Kar: मुव्ही रिव्ह्यू : ‘बघतोस काय मुजरा कर’
Just Now!
X