19 September 2020

News Flash

..म्हणून केदार शिंदे कधीच नट होणार नाही

केदार शिंदे हे उत्तम डान्सर आहेत हे फार क्वचितच लोकांना माहित असेल.

दिग्दर्शक केदार शिंदे

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली मंडळी माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधीच न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधीच न ऐकलेले किस्से कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मकरंद अनासपुरे सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव आणि प्रदीप पटवर्धन यांनी नुकतीच हजेरी लावली होती. लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून नावारुपास आलेले केदार शिंदे यांनी आपण कधीच नट होणार नसल्याचं या कार्यक्रमात सांगितलं.

केदार शिंदे हे उत्तम डान्सर आहेत हे फार क्वचितच लोकांना माहित असेल. त्यासोबतच कॉलेजमध्ये असताना त्यांचं नट होण्याचं स्वप्न होतं. केदार शिंदेंच्या मावशीने एका चित्रफितीच्या माध्यमातून या गोष्टी कार्यक्रमात सांगितल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस आरशासमोर स्वत:शी गप्पा मारताना केदार शिंदेंनी आपण कधीच नट होणार नसल्याची कबुली दिली.

वाचा : तनुश्री- नाना वादावर रेणुका शहाणेंचं खुलं पत्र

स्वत:चा सर्वोत्तम मित्र आपण स्वत:च असून त्याच्याशी काही गप्पा मारायचे असल्यास, काही कबुली द्यायची असल्यास द्यावी, असं मकरंदने केदार शिंदेंना सांगितलं. तेव्हा आरशात स्वत:शी ते म्हणाले, ‘आयुष्यात तसं फार काही ग्रेट असं तू केलं नाहीस. लेखक, दिग्दर्शक, निर्माता होशील असं कधीच वाटलं नव्हतं, पण जिद्द, मेहनत, चिकाटी यांमुळे यश मिळालं. शाहीर साबळेंचा नातू म्हणून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर केदार शिंदे म्हणून स्वत:चं अस्तित्व निर्माण करू शकलास. तुला थँक्यू म्हणायचंय. महाविद्यालयीन एकांकीका स्पर्धेत तू लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करत होतास. तेव्हा नट होण्याचं खुळसुद्धा तुझ्या डोक्यात होतं. त्यावेळी असाच आरशात उभा राहून मी चांगला नट होऊ शकतो का असा प्रश्न विचारला. तेव्हा तू मला खरं उत्तर दिलंस. तू याच क्षेत्रात राहा, पण नट होऊ नकोस असं तू मला सांगितलंस. त्यावेळी मला तुझा रागसुद्धा आला होता. पण आज जे काही करू शकलास, तेवढंसुद्धा तू नट होऊन करू शकला नसतास.’

आजकाल सोशल मीडियावर फॉलोअर्स पाहून लोकप्रियतेची मोजमाप करणारी नटमंडळी पाहतो तेव्हा बरं वाटतं की मी नट झालो नाही, असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 2:29 pm

Web Title: i will never be an actor says director kedar shinde on assal pahune irsal namune show
Next Stories
1 ‘दोस्ताना’च्या सिक्वलमध्ये राजकुमार रावची वर्णी ?
2 …जेव्हा निक बॉलिवूडकरांसोबत फुटबॉल खेळतो
3 ‘लाइफ इन अ मेट्रो’ च्या सिक्वलमध्ये तापसीऐवजी ‘दंगल गर्ल’
Just Now!
X