26 May 2020

News Flash

वेब सीरिजवर सेन्सॉरशिप येण्याची शक्यता; प्रसारण मंत्रालयाने शोधला मार्ग

वेब मालिकांमधील न्यूड सीन्सवर निर्बंध येण्याची शक्यता

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, वूट यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी दृष्य मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे. कधीही कुठेही मोबाईलवर पाहता येणाऱ्या या ऑनलाईन अ‍ॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनामुळे गेली २० वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या टीव्ही वाहिन्यांची प्रेक्षक हळूहळू कमी होऊ लागला आहे. परंतु ऑनलाईन प्लॅटफॉर्म जितके लोकप्रिय आहेत, तितकेच ते वादग्रस्त देखील ठरत आहेत. कुठल्याही प्रकारचे सेन्सॉरशीप नसल्यामुळे या अ‍ॅपचा वापर समाजात मोठ्या प्रमाणावर धार्मिक असंतोष व अश्लिलता पसरवण्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी देखील केल्या जात आहेत. या वाढत जाणाऱ्या तक्रारींवर ठोस उपाय शोधण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने पुढाकार घेतला असून, यासंदर्भात एक कार्यशाळा आयोजित केली आहे.

ही कार्यशाळा येत्या १० आणि ११ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. कार्यशाळेत माहिती व प्रसारण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही कार्यशाळा घेण्याची कल्पना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची होती. मात्र, निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते अनुपस्थित राहणार,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशीप नसल्यामुळे टीव्ही वाहिन्यांवर निर्बंध घातलेली सामग्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दाखवली जात आहे, असे आरोप वारंवार केले जातात. या आरोपांवर व त्यावरील उपायांवर मनोरंजन क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेमुळे नेटफ्लिक्स व अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन अ‍ॅपमुळे सेन्सॉरशीप आली तर या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लील दृष्य व भाषेवर मर्यादा येतील, असा तर्क लावला जात आहे. याआधीही अशाच प्रकारची एक कार्यशाळा मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली होती. परंतु या कार्यशाळेत यावर कोणताही मार्ग सापडला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 3:02 pm

Web Title: ib ministry netflix amazon film certification workshop mppg 94
Next Stories
1 वाणी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधी करायची हे काम
2 ‘कबीर सिंह’मधील भावनात्मक दृश्य साकारताना शाहिद खरोखरीच झाला रोमांचित, चाहतीने आणून दिले निदर्शनास
3 अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री कोण माहितीये?
Just Now!
X