प्रेमासारखी सुंदर गोष्ट या जगात नाही. आजवर अनेकांच्या प्रेमकथा अजरामर झाल्या. यामध्ये रोमियो-ज्युलिएट, लैला-मजनू यांची प्रेमकथा आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. प्रेम ही जगातली एक सुंदर भावना आहे. ज्याने ही भाषा शिकली त्यालाच ती उमगते आणि एका नवीन, स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. त्यामुळे अशीच एक प्रेमकथा ‘इभ्रत’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून प्रेमाच्या मार्गात येणारे अडथळे, स्वत:चा मान-सन्मान जपण्यासाठी केलेले प्रयत्न आणि यातून झालेले वाद हे सारं या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. ‘इभ्रत’मध्ये संजय शेजवळ,शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायल मिळणार आहेत. ‘इभ्रत’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


दरम्यान, ‘इभ्रत’ची कथा अण्णाभाऊ साठे यांची आहे. या चित्रपटाला सुबोध नारकर यांनी संकलित केलं असून अनिल वाथ यांनी या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलं आहे. नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तरल आणि नितळ प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.