24 November 2020

News Flash

लग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया

पाहा फोटो..

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. १६ ऑक्टोबर २०१२मध्ये सैफ आणि करीनाने लग्न केले. करीना सैफची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केले होते. त्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नात सारा आणि इब्राहिम दोघे ही लहान होते. पण सारा आणि इब्राहिम दोघे सैफच्या दुसऱ्या लग्नाला हजर होते.

करीना आणि सैफच्या लग्नातील साराचा लूक सर्वांनी पाहिला होता. पण इब्राहिमचा लूक फार कमी लोकांनी पाहिला असेल. आता सैफ आणि करीनाच्या लग्नातील इब्राहिमचा फोटो समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये इब्राहिम हा सैफ आणि करीनाच्या मागे उभा असल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वांना हसू येईल.

 

View this post on Instagram

 

Caption this! #saifalikhan #kareenakapoor #ibrahimalikhan #wedding #saifeena #BollywoodFlashback #muvyz #muvyz101920

A post shared by muvyz.com (@muvyz) on

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये इब्राहिमने शेरवानी परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच हा फोटो जेव्हा काढण्यात आला तेव्हा इब्राहिमला माहितीही नव्हते की त्याचा कोणी तरी फोटो काढत आहे. फोटोमध्ये छोटा इब्राहिम अतिशय क्यूट दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच साराने इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले होते. पण त्यापूर्वी तो त्याचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचेही तिने पुढे म्हटले होते.

अमृता आणि सैफने घरचांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करीना सैफ पेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:32 pm

Web Title: ibrahim ali khan priceless expression during father saif ali wedding avb 95
Next Stories
1 सिनेमाचं सेलिब्रेशन! काजोल- शाहरुखनं सोशल हॅण्डलमध्ये केला ‘हा’ बदल
2 कार्तिक आर्यन झळकणार ‘तेरे नाम’च्या सिक्वलमध्ये? नवा लूक होतोय व्हायरल…
3 मुकेश खन्नांच्या टीकेवर अखेर कपिल शर्माने सोडलं मौन; म्हणाला…
Just Now!
X