08 March 2021

News Flash

इब्राहिम अली खान शोधतोय हरवलेली बायको; गंमतीशीर व्हिडीओ होताय व्हायरल…

सैफ अली खानचा मुलगा गंमतीशीर व्हिडीओमुळे चर्चेत

सैफ अली खान व त्याची घटस्फोटित पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खान सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. या स्टार किडने बॉलिवूडमध्ये अद्याप पदार्पण केलेलं नाही मात्र त्याची फॅन फॉलोइंग कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तो आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी सतत गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट करत असतो. यावेळी देखील त्याने असाच एक विनोदी व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपली हरवलेली बायको शोधताना दिसतोय.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood 1M (@lnbollywood) on

…तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये इब्राहिम दोन व्यक्तिरेखा साकारताना दिसतोय. एक व्यक्ती आपल्या बायकोमुळे त्रस्त आहे. दुसऱ्या व्यक्तीची बायको हरवली आहे. यानंतर पहिला व्यक्ती विचारतो तूझी बायको दिसते कशी? यावर दुसरा उत्तर देतो खूपच सुंदर. हे उत्तर ऐकून पहिला व्यक्ती खुश होतो व म्हणतो माझी बायको जाऊदेत आपण तुझीच बायको शोधूया. खरं तर हा एक खूप जुना विनोद आहे. परंतु हा विनोद सांगताना इब्राहिमने केलेला अभिनय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 1:09 pm

Web Title: ibrahim ali khans funny video viral on social media mppg 94
Next Stories
1 “..आणि पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवले”, सतीश कौशीक यांनी शेअर केला फोटो
2 गँगस्टर विकास दुबेच्या जीवनावर येतेय वेब सीरिज; ‘हा’ चित्रपट निर्माता करणार दिग्दर्शन
3 सुशांत मृत्यू प्रकरण: “सुशांतचे पैसे तू उधळलेस बहिणीने नाही”; अभिनेत्रीने केली रियावर टीका
Just Now!
X