26 February 2021

News Flash

ICC Women’s World Cup 2017: सामना पाहण्यासाठी अक्षय कुमार अनवाणी धावत गेला

अनुष्का शर्मानेही ट्विटरवरुन भारतीय महिला खेळाडूंना पाठिंबा दिला

अक्षय कुमार आणि शाहरुख खान

क्रिकेटच्या पंढरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्याप्रमाणे दमदार खेळी दाखवत भारतीय संघ या सामन्यात इतिहास रचणार का? याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. प्रत्येक भारतीय आपआपल्या परिने महिला खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. यात आता बॉलिवूडकर तरी कसे मागे राहतील. या सामन्याकडे फक्त सर्वसामान्य प्रेक्षकांचेच नाही तर बॉलिवूडचेही लक्ष लागून राहिले आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेकांनी आपल्या शुभेच्छा भारतीय महिला क्रिकेट संघासोबत असल्याचे सांगितले. मिथाली राजच्या या टीमकडे आज साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?

सध्या शाहरुख लॉस एन्जेलिसमध्ये असून त्याने ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटरवर लिहिले की,’ तुम्ही आमची मान गर्वाने उंचावली आहे. आजच्या सामन्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा. माझे प्रेम तुमच्यासोबत सदैवर आहे.’

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लंडनला गेला आहे. त्याने टीम इंडियाला शुभेच्छा देत ट्विटरवर लिहिले की, ‘भारतीयांनो आज तुमचा पाठींबा टीम इंडियाला हवा आहे.’ त्याने नुकतेच ट्विटरवरून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या नाहीत तर आयुष्यात पहिल्यांदा त्याने अनवाणी धावत ट्रेन पकडली. त्याला वेळेत हा सामना बघायला जायचे होते. जर त्याची ठरलेली ट्रेन चुकली असती तर त्याला कदाचित त्याला या सामन्याला मुकावे लागले असते. म्हणून टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाचे प्रमोशन संपताच तो धावत या सामन्यासाठी निघाला. तिथे पोहचल्यावर त्याने खेळाडूंना प्रोत्साहन देणारे ट्विटही केले.

Next Stories
1 टायगरच्या आई-बाबांसोबत दिशाने घालवला ‘क्वालिटी टाइम’
2 Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?
3 या अभिनेत्रीमुळेच अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री
Just Now!
X