‘जंगलबुक’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र महामंडळाने U/A  प्रमाणपत्र दिल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते मुकेश भट्ट यांनी तीव्र संताप व्यक्त केला. चित्रपट प्रमाणपत्र महामंडळाला कचरापेटीतच टाकले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुकेश भट्ट म्हणाले, ‘जंगलबुक’ चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देऊन हा देश कुठल्या दिशेने जातो आहे, हेच दिसते. जर जंगलबुक चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यात येत असेल, तर केंद्र सरकारने या महामंडळाचीच आवश्यकता आहे का, याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. चित्रपट प्रमाणपत्र महामंडळाला कचरापेटीत टाकले पाहिजे. तिच त्याची योग्य जागा आहे, अशी भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
आपल्याला पहलाज निहलानींबद्दल काही बोलायचेच नाही. ते केवळ त्यांना तिथे बसवणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. जंगलबुकला U/A प्रमाणपत्र मिळल्याने मला खरोखरच देशाबद्दल लाज वाटते, असेही मुकेश भट्ट म्हणाले.