30 March 2020

News Flash

एक दिवसासाठी पंतप्रधान झाल्यास प्रभास करणार ‘हे’ महत्त्वाचं काम, पाहा व्हिडीओ

प्रभासचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

प्रभास

दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभास तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘बाहुबली’नंतर तो कोणत्या चित्रपटात झळकणार याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांना आहे. ‘साहो’ या चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये प्रभास व्यग्र आहे. प्रभास मितभाषी असून तो मुलाखतींमध्ये काय बोलतो याकडे सर्वांचंच लक्ष असतं. नुकतंच त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सहकलाकार नील नितीन मुकेशसोबत ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली. प्रभासला बोलतं करण्यासाठी कपिललाही विशेष मेहनत घ्यावी लागली. या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये कपिल प्रभासला विचारतो, ”तुला जर एक दिवसासाठी पंतप्रधान होण्याची संधी दिली तर तू काय करशील?” यावर प्रभास म्हणाला, ”मी इंडस्ट्रीतील मुलाखती बंद करेन” त्याचं हे उत्तर ऐकून कपिलसह उपस्थितांमध्ये हशा पिकला. प्रभासला फारसं बोलणं आवडत नसल्याने मुलाखती बंद व्हावीत अशी त्याची इच्छा आहे.

आणखी वाचा : ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये भूमिका साकारल्यापासून अमेयला जाणवतेय ही समस्या

प्रभास व्यतिरिक्त कपिलनं श्रद्धा कपूरला सुद्धा गंमतीदार प्रश्न विचारले. कपिल श्रद्धाला म्हणाला, ”शूटिंगच्या आधी तुझं पोट खराब होतं असं मी ऐकलं आहे.” त्यावर श्रद्धा म्हणाली, ”हो, हे खरं आहे.” श्रद्धाच्या या उत्तरावर कपिलनं संधी साधली आणि तो लगेच म्हणाला, ”तरीच तू शोचं शूटिंग सुरू होण्याआधी 3-4 वेळा वॉशरुमध्ये जाऊन आलीस.”

‘साहो’ हा चित्रपट येत्या ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये प्रभास, श्रद्धासह  नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 10:34 am

Web Title: if prabhas gets a chance to become prime minister for one day he will do this important work ssv 92
Next Stories
1 छोट्या पडद्यावरील ‘कृष्णा’ ऋषिकेशमध्ये शिकवताहेत ध्यानधारणा
2 ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये भूमिका साकारल्यापासून अमेयला जाणवतेय ही समस्या
3 राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये प्रसाद ओक; ईडी चौकशीवरून सरकारला लगावला टोमणा?
Just Now!
X