News Flash

सुहानाच्या बॉयफ्रेंडने जर तिला किस केले तर…,शाहरूखचा खुलासा

पाहा व्हिडीओ

(PHOTO CREDIT: PTI)

बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरूख खान ओळखला जातो. शाहरूख त्याची मुलगी सुहानासाठी पजेसिव वडील असल्याचे स्वत: शाहरूखने सांगितले आहे. शाहरूखचा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमधला एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शाहरूखच्या फॅनक्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित होते. त्याचवेळी करणने आलियाला अचानक एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “आलिया तू किती वर्षांची असताना तुझा पहिला बॉयफ्रेंड होता? आलिया उत्तर देत १६ असं बोलतो. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशी? या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणतो, ‘मी त्या मुलाचे ओठ कापून टाकेल.”

सुहाना आता न्यूयॉर्कमध्ये तिच पुढचं शिक्षण घेत आहे. सुहाना तिच्या मित्र-मैत्रिंनीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तर शाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार आहे, तर सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 4:19 pm

Web Title: if suhana s boyfriend kisses her shah rukh khan says i d rip his lips off karan johar agrees to it dcp 98
Next Stories
1 नागा चैतन्याची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, आमिरसोबत ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये झळकणार!
2 ‘डॉक्टर डॉन’मध्ये विक्रांत आणि मोनिकाचा साखरपुडा होणार का?
3 ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री आहे अरूण जेटली यांची भाची
Just Now!
X