17 November 2017

News Flash

‘मी १८ वर्षांचा असताना ५ वर्षांच्या मुलीशी लग्न करेन असा कधीच विचार केला नव्हता’

शाहिदची पत्नी मीरा राजपूत ही त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 8:48 PM

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत

‘आयफा २०१७’ पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वांत जास्त लक्ष वेधले ते शाहिद आणि मीराच्या जोडीने. ग्रीन कार्पेटवरील दोघांचे फोटो असो किंवा गाऊन सांभाळण्यासाठी शाहिदने मीराची केलेली मदत असो, सर्वत्र याच जोडीची चर्चा होऊ लागलीये. ‘उडता पंजाब’ चित्रपटासाठी शाहिदला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचे श्रेय शाहिदने मीराला दिले. ‘माझी ताकद, नेहमी माझ्यासाठी लकी ठरणारी,’ असे कॅप्शन देत शाहिदने सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. IIFA चे हे १८ वर्ष असल्याने शाहिदला त्याने वयाच्या १८ व्या वर्षी कोणती खट्याळ गोष्ट केली असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

शाहिद कपूर म्हणाला की, ‘मी १८ वर्षांचा होतो तेव्हा मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की मी एका अशा मुलीशी लग्न करणार आहे, जी मी १८ वर्षांचा असताना पाच वर्षांची होती. हीच गोष्ट खट्याळ असल्याचे मला वाटते.’
या संपूर्ण पुरस्कार सोहळ्यात शाहिद आणि मीराने माध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधत सर्वांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे दोघेही मिशानंतर दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. ‘हो नक्कीच’ असे म्हणत यावरही दोघांनी सकारात्मक उत्तर दिले.

Haha this answer by Shahid Kapoor is awkward yet funny! Watch the Video 📹 to find out!

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) on

#shahidkapoor @shahidkapoor @minal_0013 @zaineel19

A post shared by pratik parekh (@parekh_pratik) on

शाहिद आणि मिशाचे सुरेख फोटो सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळाले. मिशाबद्दल शाहिदला विचारले असता तो म्हणाला की, ‘माझ्या आयुष्यातील ती एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी ती आम्हाला (शाहिद आणि मीरा) बदलते. स्वत:बद्दल विचार करण्यापूर्वी मी आता तिच्याबद्दल विचार करतो.’

My strength. Always lucky for me. ❤️

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

Breakfast sugar rush. 🤓

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

PHOTOS : ईशा देओलचे ‘मॅटर्निटी फोटोशूट’

त्याचप्रमाणे मीरा आणि त्याच्या नात्याबद्दल तो पुढे म्हणाला की, ‘मी खूप कंटाळवाणा पती आहे असे माझ्या पत्नीला वाटते. मागील तीन दिवसांपासून मी कामातच व्यस्त आहे. इथे इतक्या लांब आपण आलोय आणि तुला वेळच नाही असे ती म्हणते. पुरस्कार सोहळा संपल्यानंतर मी तिच्यासाठी नक्कीच वेळ देईन.’

First Published on July 17, 2017 7:54 pm

Web Title: iifa 2017 shahid kapoor on mira rajput never thought i would marry a girl who was 5 when i was 18