08 July 2020

News Flash

Photo : आयफा अ‍ॅवॉर्डमधील ‘या’ तरुणीमुळे होते सलमानची चर्चा

यापूर्वी सलमानचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं आहे

सलमान खान

गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी त्यांचा आयुष्याचा जोडीदार शोधला. दीपिका पदुकोण- रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा-निक जोनास, अनुष्का शर्मा-विराट कोहली, सोनम कपूर- आनंद आहुजा या दिग्गज कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अद्यापही लग्न केलेलं नाही. वयाची पन्नाशी वर्ष ओलांडलेला हा अभिनेता कधी लग्न करणार याकडे साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे. मात्र सलमान कायम लग्नाचा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे अद्यापही लग्न न करता सलमान अनेक तरुणींमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी सलमानचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यामुळे त्याची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता सलमान पुन्हा एकदा एका मुलीमुळे चर्चेत आला आहे.

नुकताच आयफा अ‍ॅवॉर्ड २०१९ हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या साऱ्यात चर्चा झाली ती भाईजान आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीची. सलमान या सोहळ्यामध्ये सई मांजरेकर या नवोदित अभिनेत्रीला घेऊन आला होता. सईला पाहिल्यानंतर चाहत्यांसोबतच कलाविश्वामध्ये एकाच चर्चेला उधाण आलं.

सलमान खान, सई मांजरेकर

 

सई ही चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक असून सलमानच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटातून ती कलाविश्वामध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळेच कलाविश्वातील दिग्गजांसोबत तिची ओळख व्हावी या हेतूने तो सईला आयफा सोहळ्यामध्ये घेऊन आला होता.  दरम्यान, या सोहळ्यामध्ये सई प्रचंड ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. यावेळी तिने न्युड मेकअप केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 2:15 pm

Web Title: iifa 2019 know the actress with whom salman khan makes grand entry at awards night ssj 93
Next Stories
1 आयकर अधिकारी सांगत अभिनेत्रीची फसवणूक; तीन जण अटकेत
2 ‘अरे हे काय घातले आहे?’; रणवीरचा ड्रेस पाहून सलमानची रिअ‍ॅक्शन
3 …म्हणून बिग बींना ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’मध्ये घेतलं; दिग्दर्शकाने केला खुलासा
Just Now!
X