इलियाना डिक्रुज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. इलियाना आपल्या हॉट लुकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अर्थात आज जरी इलियाच्या आकर्षक शरीराचे कौतुक केले जात असले, तरी काही वर्षांपूर्वी तिला याच शरीरावरुन चिडवले देखील जात होते. त्यावेळी तिने आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता. असा धक्कादायक खुलासा इलियानाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत केला.

काय म्हणाली इलियाना डिक्रुज?

काही वर्षांपूर्वी इलियाना ऑस्ट्रेलियन कलाकार अँड्र्यू नीबोन बरोबर रिलेशनशीपमध्ये होती. परंतु अचानक काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपच्या धक्क्याने इलियाना ड्रिप्रेशनमध्ये गेली. याच काळात तिला ‘बॉडीडिसमॉर्फिक डिसऑर्डर’ या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत गेले. दरम्यान तिचे मित्रमंडळी तिच्या वाढत्या वजनामुळे तिची खिल्ली उडवू लागले. त्यामुळे तिला घराबाहेर पडण्याची सुद्धा भिती वाटत असे. एके दिवशी तिने या सर्व प्रकाराला कंटाळून थेट आत्महत्या करण्याचा विचार केला होता. परंतु कुटुंबीयांचा विचार करुन ती थांबली. अखेर तिने या आजाराशी लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र मोठ्या जिद्दीने, औषधोपचार आणि मानसोपचार घेऊन तिने यावर मात केली.

 

View this post on Instagram

 

How I eye everyone else’s plate at restaurants – – – @rohanshrestha

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official) on

इलियानाने नुकताच आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. ‘पागलपंती’ या आगामी कॉमेडी चित्रपटातून इलियाना लवकरच झळकणार आहे.