X
X

इलियाना म्हणते, ”सेक्सचा आनंद लुटावा पण..”

READ IN APP

शिबानी दांडेकरच्या चॅट शोमध्ये इलियानाचं वक्तव्य

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ब्रेकअप झाला आणि सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. नुकतीच तिने शिबानी दांडेकरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

इलियानाने काही दिवसांपूर्वी सेक्सबाबत वक्तव्य केलं होतं. ‘सेक्स आणि प्रेमाचा काहीच संबंध नाही’, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्याबाबत शिबानीने प्रश्न विचारला. त्यावर इलियाना म्हणाली, ”माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा काढला गेला. सेक्सचा आनंद लुटावा पण त्यात भावनासुद्धा असाव्यात. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा त्याचा विलक्षण आनंद मिळतो.”

आणखी वाचा : ..म्हणून बिग बींनी मागितली चाहत्यांची माफी

इलियाना लवकरच ‘पागलपंती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

20
X