बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन लंडनमध्ये ‘सेव्हन ओक स्कूल’मध्ये शिक्षण घेतोय तर, सर्वात लहान मुलगा चिमुकला अबरामचे आपले करिअर निश्चित करु शकेल इतके वय नाही. पण, मुलगी सुहाना मात्र बॉलीवूडमध्येच करिअर करण्याची शक्यता आहे. शाहरुखनेही आपली मुलगी बॉलीवूडमध्ये आल्यास आनंदच होईल असे म्हटले आहे.
चिमुकल्या अबरामची एक झलक ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात पहायला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर यापुढे सुहानाला बॉलीवूडमध्ये पहायला मिळणार का? याबाबत बोलताना शाहरुख म्हणाला की, “सुहाना भरपूर लाजाळू आहे आणि आमच्या घरात अभिनेत्री होण्याची इच्छा असलेलील ती एकमेव आहे. त्यामुळे सुहाना बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून करिअर करण्याचे ठरविल्यास आनंदच होईल.”