बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरला मुंबई महानगरपालिकेने दणका दिला आहे. त्याच्या सांताक्रुझ पश्चिम येथील कार्यालयाच्या अवैध बांधकामावर पालिकेने शुक्रवारी हातोडा चालवला. यामध्ये कार्यालयातील केबिन आणि अन्य भागाचा समावेश आहे.
या कारवाईविषयी माहिती देताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही कार्यालयात बांधण्यात आलेले केबिन आणि त्याला विभागणारे पार्टिशन तोडले. एच वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

वाचा : कपूर भावंडांमधली नात्यातील दरी वाढली?

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पालिकेने प्रादेशिक नगर नियोजन (एमआरटीपी) अंतर्गत अवैध बांधकाम असणाऱ्या जागेच्या मालकांना नोटीसा पाठवल्या होत्या. यामध्ये अनिल कपूरच्या कार्यालयाचाही समावेश होता. मात्र, नोटीस बजावूनही कोणतेही प्रत्युत्तर न आल्याने ही कारवाई करण्यात आली. अनिल कपूर किंवा त्याच्या प्रवक्त्यांकडून या कारवाईविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…