25 February 2021

News Flash

VIDEO: ‘उरी’ची पायरेटेड कॉपी डाऊनलोड करुन पाहणाऱ्यांवरही ‘सर्जिकल स्ट्राइक’

सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून सिनेमाच्या टीमचे कौतुक होत आहे

'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'

पायरसीची किड चित्रपटसृष्टीला पोरखून काढत आहे. पायरसीच्या कचाट्यात बॉलिवूडमधले अनेक चित्रपट सापडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत चित्रपट लीक होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ‘उडता पंजाब’, ‘कबाली’, ‘काला’ ‘२.०’, ‘संजू’, ‘रेस ३’, ‘पद्मावत’, ‘झिरो’ सारख्या अनेक चित्रपटांना पायसरीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. मात्र पायसरीवर तोडगा शोधण्यासाठी ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

उरी सिनेमा तिकीटबारीवर दणक्यात कमाई करत असतानाच काही जणांना टोरण्ट वेबसाईट्सवरून या सिनेमाची पायरेटेड कॉपी डाऊनलोड करुन पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वेबसाईटवर या सिनेमाच्या पायरेटेड अवृत्ती मिळाल्याही. मात्र अशी पायरेटेड अवृत्ती पाहणाऱ्यांवर सिनेमाच्या टीमने त्यांच्याच स्क्रीनच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राइक केली आहे.

अदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाच्या टिमने पायरसी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी गनीमी कावा करण्याचे धोरण अवलंबले आहे. सामान्यपणे कोणीतरी सिनेमागृहामध्ये चोरून शुटिंग करुन वगैरे सिनेमे टोरण्टसारख्या साइटवर लिक करतात. मात्र इथे सिनेमाच्या टीमनेच टोरण्टवर सिनेमा अपलोड केला आहे. अनेकांना हे व्हिडीओ पायरसी करणाऱ्या साईटवर उपलब्ध करुन दिले जात आहेत. ३.८ जिबीची फाइल डाऊनलोड केल्यानंतर सिनेमा पाहण्यासाठी जेव्हा व्हिडीओ प्ले केल्यास त्यामधून सिनेमा बेकायदेशीरपणे टोरण्टच्या माध्यमातून पाहणाऱ्यावरच सर्जिकल स्ट्राइक होते.

सिनेमाचे सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवल्यानंतर पहिल्याच दृष्यामध्ये सिनेमातील प्रमुख कलाकार विकी कौशल आणि यामी गौतम एका स्क्रीनसमोर बसून आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करताना दिसतात. यामध्ये यामी गौतम म्हणते, ‘ठिक पहाटे चार वाजता सार्जिकल स्ट्राइक सुरु होती. त्यांच्या लष्कराला लक्षातही येणार नाही त्यांच्याबरोबर काय होत आहे.’ कॅमेरा हळूहळू संवाद बोलणाऱ्या कलाकरांच्या मागे जातो आणि अचानक ते उठून सर्व कलाकार स्क्रीनकडे पाहतात आणि सिनेमामध्ये मेजर विहानची भूमिका साकारणारा विकी कॅमेराकडे पाहत म्हणतो, ‘अगदी तसेच जसे या वेळी आम्ही तुमच्या स्क्रीनमध्ये घुसलो आहोत. आणि तुम्हाला ते कळलेही नाही’

पुढे यामी गौतम ‘तुम्हाला काय वाटले जर आपले लष्कर त्यांच्या सिमेमध्ये घुसून त्यांना मारु शकते तर तुमच्या टोरण्टमध्ये नाही घुसू शकत?’ असा प्रश्न चोरून सिनेमा पाहणाऱ्यांना विचारते. व्हिडीओमध्ये पुढे, ‘सिनेमा पाहा पण गर्वाने. सिनेमागृहात जाऊन. चोरुन आणि बेकायदेशीपणे डाऊनलोड करुन सिनेमा पाहू नका’ असा संदेश सिनेमाची टीम देते. व्हिडीओच्या शेवटी ‘ये नया हिंदोस्तान है. ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी’, असा सिनेमातील संवाद कलाकार बोलतात आणि वीकी कौशल रिमोटने स्क्रीन बंद करताना दिसतो.

यामधून धर यांच्या टीमने विषच विषाला मारते या म्हणीप्रमाणे स्वत:च सिनेमाचे हे व्हिडीओ टोरण्ट साइटवर अपलोड करुन पायरसी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. अनेकजणांनी टोरण्ट साइटवर दिसणारे हे व्हिडीओ डाऊनलोड केल्यानंतर फसवणूक झाल्याने पुन्हा दुसरा व्हिडीओ डाऊनलोड करत नाहीत असं सिनेमाच्या टीमचं म्हणणं आहे. ३.८ जीबीच्या फाइलमध्ये अनेक व्हिडीओ असून सर्वांमध्येच सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहा असा संदेश देण्यात आला आहे. उरीच्या निर्मात्यांनी लडवलेली ही शक्कल नेटकऱ्यांना खूपच आवडली असून सोशल नेटवर्किंगवर यासाठी त्यांची स्तुतीही केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 12:03 pm

Web Title: illegally download of uri movie on torrents were victims of this genius strike
Next Stories
1 बायोपिकमधून उलगडणार नारायण मूर्तींची यशोगाथा
2 कमनशिबी ! भाऊ कदमच्या चित्रपटाला मिळेना थिएटर
3 त्यावेळी बाळासाहेब ठाकरे संचारायचे- नवाजुद्दीन सिद्धकी
Just Now!
X