27 February 2021

News Flash

…म्हणून शाहरुख झाला एअर इंडियाचा स्वयंघोषित सदिच्छादूत!

'किंग खान'कडून कौतुकाची पोचपावती मिळाली म्हटल्यावर एअर इंडिया कंपनीही खूश झाली आहे.

शाहरूख खान

एअर इंडियाच्या सेवेवर खूश होऊन ‘बॉलिवूडचा बादशहा’ शाहरुख खाननं स्वत:ला या विमानसेवा कंपनीचा ‘स्वयंघोषित सदिच्छादूत’ जाहीर केलं आहे. एअर इंडियाच्या सेवेवर आपण प्रभावित झालो असल्याचं ट्विट शाहरुखनं नुकतंच केलं. इथल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आदरतिथ्यानं माझं मन जिंकलं असून मी स्वत:ला या विमानसेवेचा ‘स्वयंघोषित सदिच्छादूत’ मानतो असं त्यानं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चक्क ‘किंग खान’कडून कौतुकाची पोचपावती मिळाली म्हटल्यावर एअर इंडिया कंपनीही खूश झाली आहे. शाहरूखचं ट्विट कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून रिट्विट करत ‘बादशाचा’ पाहुणाचार करायला ‘महाराजा’ला आवडेल असं म्हटलं आहे. शाहरूखच्या ट्विटनं आम्हाला काम करण्यास अधिकच प्रेरणा मिळाली आहे. जर शाहरूख विमानसेवा कंपनीचा सदिच्छादूत झालाच तर आम्हालाही आवडेल असं एअर इंडियानं म्हटलं आहे.

‘महाराजा हा महाराजाच असतो. वैमानिकापासून ते या विमानसेवेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यानं कामानं , त्यांनी प्रदान केलेल्या सेवेनं माझं मनं जिकंलं आहे. मी आता छातीठोकपणे स्वत:ला या कंपनीचा स्वयंघोषीत सदिच्छादूत जाहीर करतो असं शाहरूखनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 11:44 am

Web Title: impressed by services shah rukh khan declear himself unofficially ambassador of air india
Next Stories
1 ‘आता मी आनंदाने मृत्युला समोरं जाईन’
2 कपिलपाजी तुस्सी ग्रेट हो! प्रतिस्पर्धी, शूत्र आणि जुन्या कलाकारांसोबत करणार पुनरागमन
3 Video : प्रसारमाध्यमांवर चिडला शाहरुखचा अबराम
Just Now!
X