News Flash

इम्रान हाश्मी.. गरीब पाकिस्तानी

‘नो मॅन्स लॅण्ड’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनिस टॅनोविक यांच्या ‘व्हाइट लाइज’ या इंग्रजी चित्रपटात इमरान हाश्मी काम करीत असून तो पाकिस्तानी गरीब माणसाच्या भूमिकेत

| May 9, 2013 03:48 am

‘नो मॅन्स लॅण्ड’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनिस टॅनोविक यांच्या ‘व्हाइट लाइज’ या इंग्रजी चित्रपटात इमरान हाश्मी काम करीत असून तो पाकिस्तानी गरीब माणसाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
बलाढय़ कॉपरेरेट कंपनीच्या जाळ्यात एक सामान्य माणूस अडकतो. त्या कंपनीशी लढा देणाऱ्या माणसाची भूमिका इमरान साकारतोय. हे सगळे कथानक पाकिस्तानमध्ये घडणारे आहे. पाकिस्तानचे चित्रीकरण पतियाळा येथे सध्या सुरू असून इमरान हाश्मी प्रथमच चित्रपटातून पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारतोय.
सुप्रिया पाठक इमरान हाश्मीच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपट जवळपास पूर्ण होत आला असून जूनमध्ये आणखी काही दृश्ये चित्रीत केली जाणार आहेत असे समजते. भट कॅम्पच्या चित्रपटांतील भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका इमरान हाश्मीने ‘शांघाय’ या दिबाकर बॅनर्जीच्या चित्रपटात साकारली होती. एका सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत तो दिसला होता. तसेच त्याच्या  या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुकही झाले होते. आता ‘व्हाइट लाइज’मध्येही तो सर्वसामान्य माणूस साकारतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2013 3:48 am

Web Title: imram hashmi poor pakistani
टॅग : Entertainment
Next Stories
1 कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शक!
2 ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ रसिकांचा सर्वाधिक आवडता सिनेमा!
3 आता सासूबाईंसाठी अजय देवगणने घेतला पुढाकार!
Just Now!
X